Join us

Kharif Season : पिकांच्या उत्पादनवाढीसाठी संकरित व सुधारित वाण कोणते? इथं वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 7:09 PM

Kharif Season : खरीप हंगामात वेगवगेळ्या पिकांचे नवीन वाण, सुधारित वाण किंवा संकरित वाण कुठले आहेत, हे जाणून घ्या!

Kharif Season : संतांनी सांगितलेलं आहेच की, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी... त्यानुसार पीक उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची (seed)  भूमिका महत्वाची असते. खरीप हंगामात (Kharif Season) वेगवगेळ्या पिकांचे नवीन वाण, सुधारित वाण किंवा संकरित वाण कुठले आहेत, हे जाणून घेणे महत्वाचे असते. कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त शास्रज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांनी महात्मा फुले कृषी विद्यापिठाने विकसित केलेले सर्व वाणांची माहिती दिली आहे. 

बाजरी : संकरित - फुले आदिशक्ती । महाशक्ती, एबीएच १२००/१२६९, सुधारित वाण - धनशक्ती 

खरीप ज्वारी : संकरित-सीएसएच ५/९/१०/१३/१४/१६/१७/१८/२१/२३/२५/३०/३५. सुधारित-सीएसव्ही १३/१५/१७/२३/२७/१८, एसपीव्ही ४६२, पीव्हीके ८०१. 

मका : संकरित (लवकर तयार होणारे (पुसा-१, विवेक २१/१७, महाराजा.(मध्यम) बायो-९७२७, राजर्षी, फुले महर्षीं (उशिरा) बायो ९६८१), समय, कुबेर. 

तूर : आयसीपीएल-२७, विपुला, फुले, राजेश्वरी, बीडीएन ७०८/७११/७१६), बीएसएमआर ७३६/८४३.  पीकेव्ही तारा, गोदावरी, भिमा, फुले, रेणुका, पीडीकेव्ही आश्लेषा. 

मूग : वैभव, उत्कर्ष, फुले चेतक, फुले सुवर्ण, पीकेव्ही ग्रीनगोल्ड, बीएम २००२-१/२००३-२, बीपीएमआर २३६. 

उडीद - बीडीयु १, टीएयू-१, टीपीयु-४, मेळघाट, पीकेव्ही उडीद-१५, फुले वसु. 

सोयाबीन : जेएस ३३९/९३०५, एमएयूएस ७१/१५८/१६२, २ फुले कल्याणी, किमया, अग्रणी, संगम. 

सूर्यफल : संकरित केबीएसएच १/४४, एलएसएफएच ०८११७/१७१, फुले रविराज     सुधारित - इसी ६८४१४, मॉडर्न, एसएस ५६, भानू, फुले भास्कर. 

तीळ : फुले तीळ नं.१, तापी, परमा, जेएलटी-४०८. 

लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहे.

टॅग्स :खरीपशेतीशेती क्षेत्रशेतकरी