Sesame Seeds : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तीळ पिकांमध्ये (Sesame Seed) फुले पूर्णा हा वाण विकसित केला आहे. शिवाय या वाणाला २०२३ मध्ये मान्यता मिळालेली आहे. उन्हाळी लागवडीसाठी बेस्ट असलेले तीळ पिकाचे हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत, असे जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे (Oilseed Research Centre Jalgaon) तीळ पैदासकार डॉ. सुमेरसिंग राजपूत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राशी नेहमी संपर्कात असलेले प्रगतशील शेतकरी डॉ.दिलीप पाटील, राहणार -डांगरी, तालुका अमळनेर, जिल्हा.जळगाव या शेतकऱ्याकडे तिळीचे बियाणे (Til Biyane) मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या शेतकऱ्याने फेब्रुवारी महिन्यात तिळाची लागवड केली होती. विद्यापीठाने या शेतकऱ्यास बियाणे दिले होते. या शेतकऱ्याने ३ एकरवर, एकरी दोन किलो बियाण्याची लागवड केली होती. आता या शेतकऱ्याला जवळपास १७ क्विंटल उत्पादन मिळाले आहे.
आता ज्या शेतकरी बंधूंना उन्हाळी हंगामात तीळ पिकाची लागवड करायची असेल त्यांनी संबंधित शेतकऱ्यांकडून बियाणे करता येणार आहे. एक किलो बॅगेची किंमत २०० रुपये आहे. तर हेक्टरी अडीच किलो बियाणेची शिफारस करण्यात आली आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी डॉ. सुमेरसिंग राजपूत तीळ पैदासकार तेलबिया संशोधन केंद्र जळगाव यांच्याशी संपर्क साधावा.
इथ साधा संपर्क :
डॉ. दिलीप पाटील, बियाणे उत्पादित शेतकरी मोबाईल क्रमांक. 9423902900 यांच्याशी संपर्क साधावा. किंवा डॉ. सुमेरसिंग राजपूत 94051 38269 यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.