Lokmat Agro >शेतशिवार > ट्रॅक्टरपासून ते स्वयंचलित यंत्रापर्यंत, कृषी अवजारे पुरवठा योजना आहे तरी काय?

ट्रॅक्टरपासून ते स्वयंचलित यंत्रापर्यंत, कृषी अवजारे पुरवठा योजना आहे तरी काय?

latest News To buy implements for agriculture, check this government scheme | ट्रॅक्टरपासून ते स्वयंचलित यंत्रापर्यंत, कृषी अवजारे पुरवठा योजना आहे तरी काय?

ट्रॅक्टरपासून ते स्वयंचलित यंत्रापर्यंत, कृषी अवजारे पुरवठा योजना आहे तरी काय?

जर शेतीसाठी काही अवजारे अनुदानावर खरेदी करावयाची असल्यास शासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जर शेतीसाठी काही अवजारे अनुदानावर खरेदी करावयाची असल्यास शासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सध्याच्या घडीला शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करतांना नवनव्या यंत्राचा वापरही शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शेतकऱ्याला लागणाऱ्या विविध अवजारांचा पुरवठा आता शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून केला जात आहे. तुम्हाला जर शेतीसाठी काही अवजारे अनुदानावर खरेदी करावयाची असल्यास शासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अनेक शेतकरी आज वेगवेगळ्या पिकांची लागवड करताना दिसत आहे. अशावेळी वेगवेगळ्या शेती अवजारांची आवश्यकता भासत असते. यात ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मनुष्य चलीत अवजारे, प्रक्रिया संच, कापणी पश्चात प्रक्रिया यंत्र, फलोत्पादन यंत्र, स्वाचलीत यंत्र आदी अवजाराकरता राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. 

लाभ कोण घेऊ शकत?
तर या योजनेसाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक, सातबारा उतारा व आठ अ असावा. शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक. 
लाभार्थ्यास एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील. एखाद्या घटकासाठी घटक अवजारासाठी पुढील दहा वर्षे अर्ज करता येणार नाही, परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरला लागणाऱ्या अवजारासाठी लाभ मिळण्यास तो शेतकरी पात्र असेल. परंतु त्याकरता ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडावा लागेल.

काय काय कागदपत्रे लागतील
आधार कार्ड सातबारा उतारा 8अ दाखला, खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल, जातीचा दाखला, स्वयंघोषणापत्र, पूर्वसंमती पत्र.


असा करा अर्ज 
सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टल वर जावं लागेल त्यानंतर पूजा बाजूला असलेल्या शेतकरी योजना वर क्लिक करावे लागेल तुम्ही नवीन अर्जदार असाल तर तुम्हाला आधी नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल त्यानंतर लॉगिन करून राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना ही बाब निवडावी लागेल त्यानंतर अर्ज सादर करा वर क्लिक करावे लागेल अर्जात नमूद केलेल्या सगळ्या बाबी नीट भरून अर्ज सादर करावे लागेल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या महा डीबीटी या पोर्टलवर भेट द्या.

  पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: latest News To buy implements for agriculture, check this government scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.