Lokmat Agro >शेतशिवार > PM Kisan Nidhi : आजचा पीएम किसानचा १७ वा हफ्ता 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण.... 

PM Kisan Nidhi : आजचा पीएम किसानचा १७ वा हफ्ता 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण.... 

Latest News Today's 17th installment of PM Kisan nidhi will not be available to these farmers | PM Kisan Nidhi : आजचा पीएम किसानचा १७ वा हफ्ता 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण.... 

PM Kisan Nidhi : आजचा पीएम किसानचा १७ वा हफ्ता 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण.... 

PM Kisan Nidhi : आज पीएम किसान सन्मान निधीचा (PM Kisan Scheme) हफ्ता शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे.

PM Kisan Nidhi : आज पीएम किसान सन्मान निधीचा (PM Kisan Scheme) हफ्ता शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

PM Kisan Nidhi : आज पीएम किसान सन्मान निधीचा (PM Kisan Scheme) हफ्ता शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे. याबाबतची यादी देखील पीएम किसान सन्मान निधी संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. मात्र १७ व्या हफ्त्याच्या लाभापासून देखील अनेक शेतकरी वंचित राहणार आहेत. कारण अशा शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी PM Kisan E kyc) पूर्ण केली नसल्याने त्या शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळणार नाहीत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) १८ जून रोजी वाराणसी येथून ९. २६ कोटी लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर २ हजार पीएम किसान योजनेतील १७ वा हप्ता देणार आहेत. मात्र अनेक शेतकरी २ हजार रुपयांच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर आपली ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. केवायसी करूनही जर आपला हफ्ता येत नसेल तर काहीवेळा नोंदणी करताना माहिती भरण्यात चूक, पत्ता किंवा बँक खात्याबाबत चुकीची नोंद, एनपीसीआयमध्ये आधार जोडणी नसणं इत्यादी कारणांमुळे हप्ता अडकू शकतो. त्यामुळे एकदा आपला फॉर्म देखील पडताळून पहा. 

केवायसी कुठे करू शकता? 
देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटरवरदेखील तुम्ही ई-केवायसी करू शकता. किंवा फेस ऑथेंटिकेशनच्या (Face Authentication) मदतीने तुम्ही घरी बसूनच ई-केवायसी करू शकता. तसेच भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थीनी संबंधित तलाठी, तहसील कार्यालयात संपर्क साधावा. शिवाय लाभार्थी शेतकऱ्यांना अन्ड्राइड मोबाइलवरून ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 


अशा प्रकारे पूर्ण करा ई-केवायसी 

1. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोबाइलवर PM Kisan अँप डाऊनलोड करावे लागेल. 
2. अँप Install झाल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा.
3. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो अँपमध्ये टाका 
4. पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रक्रिया पार पाडल्यावर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.  

Web Title: Latest News Today's 17th installment of PM Kisan nidhi will not be available to these farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.