Lokmat Agro >शेतशिवार > राहुरी कृषि विद्यापीठाच्या 'या' बियाण्याची छत्तीसगडला भुरळ का पडली? वाचा सविस्तर 

राहुरी कृषि विद्यापीठाच्या 'या' बियाण्याची छत्तीसगडला भुरळ का पडली? वाचा सविस्तर 

Latest News Turmeric seeds of Rahuri Agricultural University were attracted to Chhattisgarh company | राहुरी कृषि विद्यापीठाच्या 'या' बियाण्याची छत्तीसगडला भुरळ का पडली? वाचा सविस्तर 

राहुरी कृषि विद्यापीठाच्या 'या' बियाण्याची छत्तीसगडला भुरळ का पडली? वाचा सविस्तर 

अशा प्रकारचे खोडकिड मुक्त निरोगी बियाणे मिळत नसल्याचे सांगत 51 क्विंटल बियाणे खरेदी केले. 

अशा प्रकारचे खोडकिड मुक्त निरोगी बियाणे मिळत नसल्याचे सांगत 51 क्विंटल बियाणे खरेदी केले. 

शेअर :

Join us
Join usNext

सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रस येथील हळद संशोधन केंद्रात उत्पादित करण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण हळद बियाण्याची भुरळ छत्तीसगडला देखील पडली आहे. या ठिकाणी छत्तीसगड राज्यातील अंबिकापुर येथील मॉ आदिशक्ती बीज उत्पादक कंपनीने भेट दिली. यावेळी अशा प्रकारचे खोडकिड मुक्त निरोगी बियाणे मिळत नसल्याचे सांगत ५१ क्विंटल बियाणे खरेदी केले. 

भारत हा हळद पिकाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा ब्रिटिश कालखंडापासून गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी तंत्र विद्यालय, कसबे डिग्रस येथे उत्पादित करण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण हळद बियाण्यास केवळ महाराष्ट्रातच नाही, तर इतर परराज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या प्रेरणेने विद्यापीठात अमुलाग्र बदल होत आहेत. 

दरम्यान कृषी तंत्र विद्यालय, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्राचार्य डॉ. मनोज माळी यांनी एक हेक्टर क्षेत्रावर सेलम आणि फुले स्वरूपा या वाणांचा हळद बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात आला होता. मे २०२३,मध्ये लागवड करून उरलेली सर्व कामे खुरपणी, तण नियंत्रण,कीड व रोग प्रतिबंधक उपाययोजना, भरणी खते देणे, ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब इत्यादी सर्व कामे विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या आवडीने आणि अनुभव आधारित शिक्षण घेण्याच्या दृष्टीने केलेली आहेत. ‌वार्षिक परीक्षा सुरू असताना देखील स्वतःहून एक ते दीड तास हळद काढणी, बेणे निवडणे, भेसळ ओळखणे, बेणे साठवणे, मातृकंद, बगलगड्डे, सोरा गड्डे, हळकुंडे इत्यादी सर्व कौशल्यपूर्वक कामे विद्यार्थी विद्यार्थिनी केलेली आहेत.

हळदीचे निरोगी बियाणे           
           
हळदीचे निरोगी बियाणे छत्तीसगड राज्यातील मॉ आदिशक्ती बीज उत्पादक कंपनी, अंबिकापुर, छत्तीसगड येथील संचालकांना पसंत पडले. त्यांनी कृषी तंत्र विद्यालय आणि हळद संशोधन केंद्राचे एकूण ५१ क्विंटल बियाणे खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि कष्टाचे कौतुक करत प्रेरणा दिली. कृषी तंत्र विद्यालयाने हळदीचे उत्पादन क्षेत्र वाढवावे, निरोगी निर्यातक्षम बियाणे निर्मितीवर भर द्यावा आणि शेतकरी सेवेत कमी पडू नये अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कार्य पाहून समाधान व्यक्त केले.

Web Title: Latest News Turmeric seeds of Rahuri Agricultural University were attracted to Chhattisgarh company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.