Join us

Agriculture News : ज्याला शेतीचे अर्थशास्त्र समजले, त्याला नक्की यश मिळेल! वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 2:14 PM

Agriculture News : भाजीपाल्याची शेती, फुलशेती, वनशेती करणे नफ्याची शेती ठरू शकते. त्यासाठी नवीन प्रयोग गरजेचे...

शेतीचे अर्थशास्त्र (economics of agriculture) समजले तरच फायदा होईल. धानाला योग्य भाव मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी धान शेतीचा पिंगा सोडून भाजीपाल्याची शेती, फुलशेती, वनशेती करणे नफ्याची शेती ठरू शकते. त्यासाठी नवीन प्रयोग गरजेचे, असे मत गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) वैरागड येथील प्रयोगशील शेतकरी राजकुमार नंदनधने यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न : पिकांचे नियोजन कसे करावे ?उत्तर : नवी शेती म्हणजे जमीन तीच पण त्यात नवीन प्रयोग आणि नियोजन महत्त्वाचे असते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात सगळ्याच शेतकऱ्यांचे टमाटर, वांगी बाजारात येतात. तेव्हा योग्य भाव मिळत नाही. त्यासाठी लागवडीची वेळ बदलवणे महत्त्वाचे असते.

प्रश्न : भाजीपाल्याची लागवड फायदेशीर ठरेल?उत्तर : पावसाळ्यात वांगी, टोमॅटो व इतर भाजीपाला यांना चांगला भाव असतो. त्यामुळे साधारण जून-जुलै महिन्यात भाजीपाला पीक जर हाती आले तर त्याला चांगल्या भावात विकले जाते. आता माझ्याकडे भेंडी, चवळी व इतर भाजीपाला पीक आहेत आणि त्याला योग्य बाजार भावदेखील मिळत आहे.

प्रश्न : कमी पाण्यात अधिक पीक कसे घेता येईल?उत्तर : शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेल्या पाण्याचे नियोजन करावे. पिकाला सलग पाणी देण्यापेक्षा ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन उपकरणांचा वापर केल्यास चांगले उत्पादन घेता येईल. कमी सिंचन व्यवस्था आणि अधिक उत्पन्न आणि आर्थिक सुबत्ता देणारे पीक शोधले पाहिजेत.

प्रश्न : शेतीचा खर्च कसा कमी करता येईल? उत्तर : पूर्वीपेक्षा प्रति हेक्टरी उत्पादन वाढले असले तरी वारेमाप! रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. तुमच्या शेतातील तण सेंद्रिय खत ठरू शकते. पण, तणनाशकामुळे शेतीतील तण झपाट्याने नष्ट होत आहेत. त्यामुळे जमिनीचा पोत घसरत चालला आहे. सेंद्रिय खताचा वापर झाल्यास शेतीचा खर्च आपोआप कमी होईल. प्रश्न : शेतकरी बंधूंना काय सांगाल ?उत्तर : माझ्याकडे दोन एकर शेती आहे. या दोन एकरात ११ प्रकारचे भाजीपालावर्गीय पीक घेतो. धानाच्या शेतीपेक्षा भाजीपाला शेती नफ्याची ठरते. शेतकऱ्यांनी वनशेती, फुलशेती, करावी. धानाचा पिंगा सुटणार नाही, तोपर्यंत आर्थिक समृद्धी येणार नाही. शेतकरी बांधवांनी शेतीचे अर्थशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे ठरते

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीअर्थव्यवस्थागडचिरोली