Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून (Union Budget 2024) शेतकऱ्यांना, शेतीसाठी विविध योजना, निधीची तरतुद होईल अशी अपेक्षा असताना केवळ घोषणा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद आणि १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएम किसान व इतर योजनांचे कार्यक्षेत्र वाढविणार असल्याचे सांगण्यात येत होते, त्यावर कार्यवाही झाली अर्थसंकल्पातून दिसून आले.
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सरकारचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. जवळपास दीड तासांच्या भाषणात देशातील महिला,युवक, गरीब नागरिकांसाठी विविध योजनांची घोषणा केली. मात्र शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी आवश्यक योजनांचा मात्र विसर पडल्याचे दिसून आले. नेमक्या काय काय घोषणा केल्या आहेत, त्यावर एक नजर टाकुयात....
- कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद
- १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार
- शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी विविध उपाय राबविण्यात येणार.
- शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार
- ग्रामीण भागातील जमिनीचे वाद सोडविण्यासाठी नोंदीचे डिजिटलायजेशन करणार
- उत्पादन वाढवण्यासाठी संशोधनावर भर देणार.
- वातावरणाचा प्रभाव कमी होण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणणार
- भाज्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर स्कीम आणली जाणार.
- भाजीपाला वाहतुकीसाठी साखळी मजबुतीसाठी प्रयत्न
- डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनावर विशेष भर
- ३२ फळे आणि १०९ भाज्यांच्या जाती वितरित करणार
- आर्थिक वर्ष २५ मध्ये खरीप पिकांसाठी ४०० जिल्ह्यांचा डिजिटल क्रॉप सर्व्हे केला जाणार.
- डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनावर सरकार विशेष प्रयत्न करणार
- सिंचन प्रकल्पांसाठी ११, ५०० कोटींची आर्थिक मदत केली जाणार
- पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी चांगला प्रतिसाद