Commercial Agriculture : भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात शेतकरीशेतीसोबतच इतरही अन्य शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देत असतात. यालाच वाणिज्य शेती किंवा व्यावसायिक शेती म्हणून ओळखले जाते. व्यावसायिक शेतीची झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. आज व्यावसायिक शेतीबाबत समजून घेऊया....
व्यावसायिक शेती (Vanijya Sheti) हा एक प्रकारचा कृषी पूरक शेती म्हणून ओळखली जाते. ज्यामध्ये शेतकरी व्यावसायिक कारणांसाठी त्यांची शेती करत असतो. ज्याला आपण व्यावसायिक शेती म्हणतो. या शेतीमध्ये मोठ्या आणि अवजड यंत्रांसोबत अधिकची जमीन शेतीसाठी वापरली जाते. एवढेच नाही तर शेतीची ही एक आधुनिक पद्धत आहे, असेही म्हटले जाते. जे मोठ्या प्रमाणावर अधिकची जमीन, मजूर आणि यंत्रे वापरली जातात. शेतकरी बांधवांसाठी एक्वापोनिक्स शेती ही व्यावसायिक शेतीची सर्वोत्तम पद्धत मानली जाते. कारण या शेतीमध्ये आपण एकाच शेती पद्धतीत आरामात रोपे आणि मासे वाढवू शकतो आणि मग शेतकरी ती बाजारात विकून चांगला नफा मिळवू शकतो.
व्यावसायिक शेती करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत केली जाते. यासाठी विविध योजनांचा अवलंब केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सोयीस्कर होत असते. विशेष म्हणजे ही शेती अनेक देशांमध्ये केली जात आहे. या शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी याकडे वळू लागले आहेत. व्यावसायिक शेतीमध्ये, आधुनिक निविष्ठांच्या उच्च डोसचा वापर करून उत्पादकता वाढविली जाते. त्यात नगदी पिके व धान्ये पिके घेतली जातात. व्यावसायिक धान्य लागवडीसाठी गहू आणि मका ही सर्वात सामान्य पिके आहेत, जी शेतकरी त्यांच्या शेतात वाढवू शकतात आणि बाजारात विकू शकतात.
शेतकऱ्यास कृषी क्षेत्राचे ज्ञान
तसे पाहिले तर आशिया आणि युरोपातील शेतकरी या प्रकारची शेती अधिक करतात. या शेतीमध्ये आधुनिक सिंचन पद्धती वापरल्या जातात. व्यावसायिक शेतीतून उच्च उत्पादकता मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांना योग्य प्रमाणात बियाणे, रासायनिक खते, योग्य प्रमाणात कीटकनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. एकूणच काय तर शेतीच्या विपरीत जेथे पशुधन पाळले जाते किंवा वैयक्तिक वापरासाठी पिकांची लागवड केली जाते, अशा व्यावसायिक शेतीमध्ये व्यवसायासाठी पिके आणि पशुधन वाढवणे हे मुख्य असते.
Contract Farming : तुम्ही कधी करार शेती केलीय का? जाणून घ्या करार शेती म्हणजे काय?