Lokmat Agro >शेतशिवार > Vegetable Gardening : परसबागेचे गंगा माँ मॉडेल पाहिलंत का? अशी फुलवा परसबाग, वाचा सविस्तर 

Vegetable Gardening : परसबागेचे गंगा माँ मॉडेल पाहिलंत का? अशी फुलवा परसबाग, वाचा सविस्तर 

Latest news Vegetable Farming Residue Free Farming how to manage Vegetable Gardening | Vegetable Gardening : परसबागेचे गंगा माँ मॉडेल पाहिलंत का? अशी फुलवा परसबाग, वाचा सविस्तर 

Vegetable Gardening : परसबागेचे गंगा माँ मॉडेल पाहिलंत का? अशी फुलवा परसबाग, वाचा सविस्तर 

Vegetable Gardening : आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या उपलब्ध जागेत परसबाग करता येते. पण कशी ते पाहुयात..

Vegetable Gardening : आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या उपलब्ध जागेत परसबाग करता येते. पण कशी ते पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext


Vegetable Gardening : आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या उपलब्ध जागेत परसबाग करता येते. या जागेत भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा उपलब्ध असावी. परसबागेसाठी जागेची निवड करताना जमिनीची सुपीकता, संरचना व पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यास वर्षभर भाजीपाला पिके घेता येतात. दिवसाच्या जास्तीत जास्त काळात फळझाडे व भाज्यांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. मात्र काही पालेभाज्या कमी सूर्यप्रकाशात अथवा सावलीतही घेता येतात. बराच काळपर्यंत पावसाचे पाणी किंवा दव पडल्याने झाडांची पाने ओली राहिल्यास पानांना रोगांची लागण होते. म्हणून बागेत खेळती हवा असावी. 

जागेची निवड

थंडीची लाट व गरम हवेच्या झळांपासून बागेतील झाडांचे संरक्षण करण्याची आवश्यकता असते. चोर, शेळ्या आणि मोकाट जनावरांपासून बागेतील झाडाचे संरक्षण करण्यासाठी मजबूत कुंपण किंवा गडगा असावा. जमीन भारी किंवा बाईट निचऱ्याची असल्यास त्या जमिनीत नदीतील गाळ, वाळू आणि सेंद्रिय पदार्थ घालून जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा निचरा करावा. परसबागबी जमीन खळग्याची चुनखडीयुक्त) नसावी. परसवाणेसाठी जागेचा आकार जसा असेल तसा तो स्वीकारावा लागतो; परंतु शक्यतो ही जागा आकाराने चौकोनी असावी, जागच्या कोप-यान सावलीत कंपोस्ट खताचे एक किंवा दोन गाडे ठेवावेत आणि त्यामध्ये चारातील पालापाचोळा, परातीलच आणि पिकाचे अवशेष टाकावेत. 

परसबागेची आखणी

परसबागेची जागा भरपूर मोठी असल्यास बागेच्या उत्तरेकडील बाजूला पपई, केळी, कागदी लिंबू, कढीलिंब, शेवगा, पेरू, द्राक्षे, नारळ, चिकू, संत्री आणि मोसंबी यांसारखी उंच फळझाडे लावावीत. यामुळे झाडांची सावली भाजी-पिकावर पडणार नाही. परसबागेतील उपलब्ध जागेचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी वेलवर्गीय भाज्या (उदाहरणार्थ, वाल, काकडी) कुंपणावर, भिंतीवर किंवा गच्चीच्या कठड्यावर वाढवाव्यात. लहान अथवा मध्यम आकाराच्या परसबागेत बटाटे, रताळी, सुरण, जास्त काळ जमिनीत वाढणारी पिके घेऊ नयेत, पालक, आंबटचुका, चाकवत, अंबाडी, लेट्यूस, मेथी, कोथिबीर, चवळाई, पुदिना, मुळा, गाजर व पातीसाठी कांदे या भाज्या बाजारातून विकत आणल्या तर लवकर सुकतात. म्हणून ताज्या भाज्या मिळण्यासाठी लहान परसबागेत कमी कालावधीच्या पालेभाज्यांना प्राधान्य द्यावे.


परसबागेचे व्यवस्थापन

पक्व भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. याशिवाय त्या आकर्षक दिसतात आणि त्यांची चव आणि स्वाद उत्तम असतो. मूळभाज्या कोवळ्या असताना वाढाव्यात. त्या लवकर जाड बनतात. टोमॅटो, खरबूज, कलिंगड, कोहळे या फळभाज्या पिल्ल्यास्तख काडाण्यात ता इतर पालेभाज्या कोवळ्या असताना काडाव्यात, पालेभाज्यांना फुले लागध्यपूर्वी त्यांची पाने खुडावीत, त्यामुळे अधिक पाने मिळतात. मिरची, कांदा, अपक्व किंवा पक्व स्थितीत काढून वापरता येते. थोडक्यात योग्य काळजी घेतल्यास कमी खर्चात आपणाला ताज्या, स्वादिष्ट, सकस व चवदार भाज्या दररोज मिळवता येतात.

परसबागेचे गंगा माँ मॉडेल 

अशा पद्धतीने हा एक पॉईंट पाच फूट रुंदीचा रस्ता तयार होईल हा तयार झालेला रस्ता 4.5 फूट व्यास असलेल्या वर्तुळापर्यंत जाईल बाहेरील वर्तुळाचे प्रत्येक परिवर या प्रमाणेच रस्ता 4.5 फूट व्यास असलेल्या वर्तुळापर्यंत बनवावा. आता सर्वात आतील म्हणजे तीन फूट व्यास असलेल्या वर्तुळात शंकू किंवा नरसाळ्याच्या आकाराप्रमाणे दोन फूट खोदावे या वर्तुळाकार खड्ड्यात काही अशा जैविक वस्तू टाकाव्यात की ज्यांना कुजण्यासाठी कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी लागेल त्यामध्ये नारळाच्या शेंड्या तूर किंवा कापसाच्या फांद्या बॅगचा वापर करावा या थरावर लवकर विघटित होणाऱ्या म्हणजे वनस्पतीचा वाळलेला पाचोळा इत्यादी थर द्यावा. खड्डा भरल्यानंतर यावर एवढा मोठा दगड किंवा फरशी तुकडा ठेवावी की ज्यावर बसून भांडी घासता येतील किंवा कपडे धुता येतील.

संकलन : पवन चौधरी, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, केव्हीके मालेगाव 

Web Title: Latest news Vegetable Farming Residue Free Farming how to manage Vegetable Gardening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.