Join us

Red, Black Rice Seed : काळा आणि लाल भात लागवड करायचीय, बियाण्यांसाठी इथे साधा संपर्क 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 4:59 PM

Agriculture News : रेड राईस अँड ब्लॅक राईस (चकाऊ) हे भात बियाणे विक्रीस सुरवात झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात भात लागवड (Paddy Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. यात इंद्रायणी भातासह इतर वाण पेरले जातात. सध्या भात पेरणीची लगबग सुरु असल्याने शेतकरी भात पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. यातच काळा आणि लाल भात देखील काही प्रमाणात केला जातो. या या दोन्ही वाणांची विक्री सुरु असून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. 

नाशिक (Nashik) कृषी विभाग आत्माच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील वनराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला लाल आणि काळे वाणाचे भात बियाणे देण्यात आले होते. या कंपनीने आपल्या शेतात या दोन्ही वाणांचे उत्पादन घेत यंदा शेतकऱ्यांसाठी या दोन्ही वाणांचे बियाणे (Rice Seed) उपलब्ध करून दिले आहेत. यात रेड राईस (इंद्रायणी 7) ब्लॅक राईस (चकाऊ) हे भात बियाणे विक्रीस सुरवात झाली असून जवळपास 60 किलोहून अधिक बियाणे विक्री झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना बियाणे आवश्यक आहेत, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आअहे. 

या ठिकाणी 5 किलो बियाण्याची बॅग असून ती 50 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी या बियाण्यांची लागवड केल्यास त्यांचे निघालेले उत्पादन 30 किलो प्रमाणे खरेदी केले जाणार आहे. सद्यस्थितीत बियाणे विक्री सुरू असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बियाण्यांचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल, असं आवाहन देखील करण्यात आले आहे. 

टॅग्स :भातशेतीशेती क्षेत्रनाशिक