सध्याच्या घडीला अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळू लागले आहेत. यात अनेक पर्याय असून आता आयात-निर्यात असाही पर्याय समोर येऊ लागला आहे. मग फक्त कृषी क्षेत्राचा विचार केला तर भाजीपाला, फळे आदींची आयात निर्यात केली जाऊ शकते. याच अनुषंगाने जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला आयात निर्यातीचा व्यवसाय करावयाचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे आपल्याकडे असावी लागतात, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
तर महाराष्ट्र पणन महामंडळच्या संकेतस्थळावर आयात निर्यात सुरु करण्याबाबत इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार जर आपणास किंवा शेतकऱ्यांना आयात निर्यात व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास अनेक गोष्टींची आवश्यकता असते. यात जरी तुम्ही शेतकरी असाल तरी निर्यात व्यवसाय चालू करता येऊ शकतो. निर्यात व्यवसायासाठी प्रथम आपणास स्वतःची कंपनी सुरू करून त्याची नोंदणी करावी लागते. कंपनी सुरू करण्याचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. एकमेव मालकी हा व्यवसायाचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये एक व्यक्ती व्यवसायाचा मालक असतो. या प्रकारचा व्यवसाय तुम्ही अगदी सहजतेने सुरू करू शकता. तुम्ही जर एकट्याने व्यवसाय सुरू करत असल्यास तुमच्यासाठी हा व्यवसायाचा प्रकार सर्वोत्तम आहे. Sole Proprietorship साठी तुम्हाला उद्यम आधार यावर रजिस्ट्रेशन करावे लागते - https://eudyam.com/udyam किंवा Shop Act License काढावे लागू शकते.
सामान्य भागीदारी सामान्य भागीदारी म्हणजे ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय सुरू करतात, तो व्यवसाय चालवितात. सामान्य भागीदारी हा Indian Partnership Act, 1932 द्वारे नियंत्रित केला जातो. पार्टनरशिप बाबत करार करावे लागते, तसेच केलेल्या करारानुसार, व्यवसायातील नफा आणि तोटा हा व्यवसायातील भागीदारांमध्ये विभागणी केला जातो.
मर्यादित दायित्व भागीदारी :यात काही भागीदार किंवा सर्व भागीदार यांची दायित्व / जबाबदारी मर्यादित असते. म्हणजे व्यवसायावरील कर्जासाठी आणि नुकसानीसाठी भागीदार हे वैयक्तिकरीत्या जबाबदार नसतात. या प्रकारच्या भागीदारीला बहुतेक लोक प्राधान्य देतात, कारण सामान्य भागीदारीपेक्षा याचे बरेच फायदे आहेत. या प्रकारच्या व्यवसायामध्ये कमीत कमी २ सदस्य किंवा भागीदार असू शकतात. जास्तीत जास्त भागीदारांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. या प्रकारच्या व्यवसायामध्ये व्यवसायाची मालकी हस्तांतरित केली जाऊ शकते. या प्रकारचा व्यवसाय हा Limited Liability Partnership Act, 2008 नुसार नियंत्रित केला जातो. तुमचा व्यवसाय जर वाढण्याच्या काळामध्ये असेल किंवा जर तुम्ही मोठ्या Level वर व्यवसाय / कंपनी सुरू करण्याच्या विचारात असाल तर हे दोन प्रकारचे व्यवसाय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर होऊ शकतात.
खाजगी लिमिटेड कंपनी : खाजगी लिमिटेड कंपनी हा प्रकार वाढत्या व्यवसायांसाठी किंवा जे व्यवसाय वाढीच्या स्टेजमध्ये आहे, त्यांच्यासाठी एक उत्तम प्रकार आहे. या प्रकारच्या व्यवसायाची नोंदणी ही कंपनी कायदा 2013 नुसार केली जाते. जर व्यवसायासाठी एक मोठा निधी उभा करायचा असेल तर त्यासाठी हा व्यवसायाचा प्रकार उत्तम आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त 200 सदस्य असू शकतात. भारतातील बऱ्याच भागात परकीय गुंतवणुकीला परवानगी आहे.
पब्लिक लिमिटेड कंपनी : पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये, कंपनीचे शेअर्स /भागभांडवल सार्वजनिकपणे गोळा केले जातात. यामध्ये सर्वसामान्य माणसेदेखील या पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे शेअर्स / भागभांडवल घेऊ शकते, पब्लिक लिमिटेड कंपनीला शेअर बाजारामध्ये लिस्ट केले जाऊ शकते किंवा त्या कंपनीला अनलिस्ट देखील ठेवलं जाऊ शकते. पब्लिक लिमिटेड कंपन्यांचा मालक कोणी एक व्यक्ती नसतो. कंपनीचे जे भागधारक असतात तेच कंपनीचे खरे मालक असतात. पब्लिक लिमिटेड कंपनीला कंपनी अॅक्ट 2013 नुसार नोंदणी केली जाते आणि कंपनीचे एक स्वतंत्र अस्तित्व असते. तुम्हाला जर मोठं भागभांडवल उभे करायचं असेल तर या प्रकारच्या व्यवसायाचा उपयोग होतो. कंपनीचे शेअर्स/भागभांडवल विकून मोठ्या प्रमाणावर उभे करता येतात.
ही कागदपत्रे आवश्यक
पॅन कार्ड- पॅन कार्ड हे देशातील विविध टॅक्स भरणाऱ्या व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशनला ओळखण्याचे साधन आहे. कंपनीच्या प्रकाराप्रमाणे पॅन कार्ड काढणे बंधनकारक आहे. इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट परवाना इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट परवाना हा डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांचेकडे नोंदणी करून आयात निर्यात परवाना जारी करतात. केवळ आयात परवाना असलेल्या आयातदारांना परदेशातून भारतात माल आणण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे निर्यात परवाना आहे, त्यांनाच निर्यात करता येते आणि डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्या योजनेचा लाभ मिळतो. आयात-निर्यात कोडसाठी www.dgft.gov.in ही साईट वापरा.
आयात-निर्यात कोडसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
अर्जदार, फर्म किंवा कंपनीच्या पॅन कार्डची प्रतअर्जदाराची मतदार ओळखपत्र, आधार किंवा पासपोर्टची प्रतअर्जदार, कंपनी किंवा फर्मच्या चालू बँक खात्याचा चेक रद्द केलेलाऑफिस कॅम्पसच्या वीज बिलाची किंवा भाडे कराराची प्रत
निर्यात व्यवसायासाठी महत्वाचे
वस्तू आणि सेवा कर निर्यात व्यवसायाला GST नंबर अनिवार्य आहे. RCMC- RCMC रेजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट. ज्यांना निर्यात व्यवसाय चालू करायचा आहे त्यांच्यासाठी हे एक अनिवार्य सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल देते. फळे आणि भाज्या निर्यात करण्यासाठी अपेडा ही संस्था RCMC सर्टिफिकेट जारी करते. सेंट्रल एफ एस एस आय लायसन्स एफएसएआयला आपण भारतीय अन्न प्राधिकरण म्हणून ओळखतो. एफएसएस ह्या कायद्यानुसार रूल आणि रेग्युलेशनचे पालन करत असलेल्या खाद्य व्यावसायिकांना १४४ अंकी लायसन नंबर जारी केला जात असतो. FSSAI लायसन्स हे फळे आणि भाज्या निर्यात करण्यासाठी अनिर्वाय आहे. हे लायसन्स Food Safety And Standard Authority of India जारी करते.
Port Registration - भारतातून निर्यात आणि आयात करण्यासाठी पोर्ट रेजिस्ट्रेशन हे आवश्यक आहे. ICE GATE या पोर्टलवर जाऊन वर दिलेली सगळी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचे पोर्ट रेजिस्ट्रेशन होते. पोर्ट रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्ही भारतातून फळे आणि भाज्या निर्यात आणि आयात करू शकता. या सगळ्या कागदपत्रांच्या साहाय्याने तुम्ही तुमचा आयात-निर्यात व्यवसाय चालू करू शकता.