Lokmat Agro >शेतशिवार > Weeding Machine : उभं राहून करा शेतातील खुरपणी, स्वस्तात मस्त असलेलं खुरपणी यंत्र, वाचा सविस्तर

Weeding Machine : उभं राहून करा शेतातील खुरपणी, स्वस्तात मस्त असलेलं खुरपणी यंत्र, वाचा सविस्तर

Latest News Weeding machine for internal cultivation, useful for sugarcane, cotton crop see details | Weeding Machine : उभं राहून करा शेतातील खुरपणी, स्वस्तात मस्त असलेलं खुरपणी यंत्र, वाचा सविस्तर

Weeding Machine : उभं राहून करा शेतातील खुरपणी, स्वस्तात मस्त असलेलं खुरपणी यंत्र, वाचा सविस्तर

Khurpani Machine : आधुनिक खुरपणी यंत्र हाताळण्यास सोपे व सहज वापरता येते. देखभाल व दुरुस्ती खर्च कमी येतो. 

Khurpani Machine : आधुनिक खुरपणी यंत्र हाताळण्यास सोपे व सहज वापरता येते. देखभाल व दुरुस्ती खर्च कमी येतो. 

शेअर :

Join us
Join usNext

- अमोल गायकवाड
अहमदनगर :
शेतीची विविध कामे ही वेळेवर आणि तत्परतेने करावी लागतात. आंतरमशागतीच्या (Cutivation) कामासाठी छोटी अवजारे व कृषी यंत्रांचा (Agri Machine) वापर फायदेशीर ठरू शकतो. अशाच प्रकारे कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील युवा शेतकरी केशव गायकवाड यांच्या कपाशी पिकाच्या शेतात नव्याने तयार झालेले आधुनिक खुरपणी यंत्राचा वापर करण्यात आला. 

या यंत्रास कपाशीच्या (cotton Crop) पिकातील अंतर्गत मशागतीसाठी एकरी ५ लिटर इंधन लागते. मशागतीचा एकरी भाव २ हजार आहे. एक एकर पिकातील अंतर्गत मशागतीसाठी जास्तीत जास्त अडीच तास लागतात व कमीत दीड तास लागतात. यंत्राला छोटे स्वतंत्र रोटाव्हेटर आहे. त्यामुळे ऊस, कपाशी यातील तण काढण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये १८ पाते असून, ती जमिनीमध्ये १५ सेंमी पर्यंत खोल जातात. तण मुळापासून नष्ट होते. हाताळण्यास सोपे व सहज वापरता येते. देखभाल व दुरुस्ती खर्च कमी येतो. 

तसेच याचा वापर केल्यामुळे वेळेची, पैशाची व श्रमाची बचत होते. बैलजोडीची अवजारे व बैलजोडी आता हळूहळू नामशेष होत चालली आहे. अगदी कमी शेतकऱ्यांकडे बैलजोडीची अवजारे बघण्यास मिळत आहे. पाऊस कमी जास्त असल्याने चाऱ्याचा बिकट प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्याचे भाव पणं जास्त असतात. पुढे पिकाला योग्य भाव मिळेल का नाही हे आधीच सांगू शकत नसल्याने शेतकरी काटकसरीने पिकाला खर्च करतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या खुरपणी यंत्राला शेतकरी जास्त पसंती देत आहेत.


मी मागील वर्षी आधुनिक खुरपणी यंत्र अवघ्या ५० हजार रुपयास खरेदी केले. यामुळे मी या यंत्राच्या साहाय्याने कमी वेळेत जास्त मशागत करू शकलो. आणि एका वर्षात जवळपास या यंत्राची किमत वसूल केली आहे. या यंत्रास शेतकरी जास्त प्रमाणात पसंती देत आहे.
-अशोक गायकवाड, खुरपणी यंत्र मालक

मजूर मिळत नसल्याने पिकाची मशागत करणे अवघड होते. मजुरांची रोजंदारी दिवसाला कमीत कमी तीनशे ते चारशे रूपये आहे. एवढा खर्च करणे शेतकऱ्यास परवडणारा नाहीये. या यंत्राच्या साहाय्याने केलेली मशागतीस कमी खर्च लागतो. व वेळेनुसार लगेच उपलब्ध होते. हे यंत्र खरेदी करण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे म्हणजे गरजू शेतकरी ते खरेदी करू शकतील. 
-केशव गायकवाड, शेतकरी शिरसगाव

Web Title: Latest News Weeding machine for internal cultivation, useful for sugarcane, cotton crop see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.