Budget 2024 : यंदाचा म्हणजेच 2024 अर्थसंकल्प नुकताच संसदेत सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध मुद्द्यांवर बोलताना देशातील दूध उद्योग आणि मत्स्त्य व्यवसाय वृद्धीसाठी योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र असा ठोस असा निर्णय घेतला नसल्याचे दिसून आले.
एकीकडे देशात दूध आणि मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. दूध व्यवसाय हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जोरावर चालतो. तर मत्स्य व्यवसाय हा देखील मासेमारी करणाऱ्या एका मोठ्या वर्गावर अवलबूंन आहे. मात्र या दोन मुख्य व्यवसायांसाठी केवळ विविध योजनांच्या माध्यमातून विकासासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सूतोवाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
Budget 2024: शेतकऱ्यांसाठी यंदाच्या बजेटमध्ये काय तरतूदी?
बजेटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
दूध उद्योगासाठी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या योजना सोडविण्यासाठी विविध योजना राबविणार
राष्ट्रीय गोकुळ मिशन, लाईव्ह स्टॉक मिशन या योजनांना बळ दिले जाणार
पीएम मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन दिले जाणार
मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन
मासेमारी करणाऱ्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, महत्वाच्या पाच अक्वा कल्चर ची निर्मिती करण्यात येईल.