Join us

पीएसएफ योजना काय आहे? योजनेंतर्गत तूर खरेदीसाठी नोंदणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:13 PM

केंद्र सरकारच्या पीएसएफ योजनेंतर्गत बाजारभावाने शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे.

केंद्र सरकारच्या पीएसएफ योजनेंतर्गत बाजारभावाने शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. देवळा, शेतकरी सहकारी संघ लि. मालेगाव व येवला तालुका खरेदी विक्री संघ लि. येवला येथे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी पीएसएफ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

दरम्यान बाजारभावानुसार शेतकऱ्यांनी एनईएमएल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. यासाठी स्वत:चा तुरीची नोंद असलेला सातबारा, आधारलिंक असलेला बँक खाते क्रमांक, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत व मोबाईल क्रमांक संबंधित खरेदी केंद्रावर देणे आवश्यक आहे. असेही जिल्हा पणन अधिकारी बी.आर. पाटील यांनी कळविले आहे.

पीएसएफ योजना काय आहे? 

नाफेडच्या माध्यमातून प्राइस स्टॅबिलायझेशन फंड (PSF) योजना राबवली जात आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा म्हणून या योजनेंतर्गत खरेदी केली जाते. सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (एमएसपी) बाजारातील किमती खाली येतात, तेव्हा नाफेड कृषी मालाची खरेदी करते. ही खरेदी किंमत समर्थन यंत्रणा म्हणून काम करते. म्हणजेच दैनंदिन जो बाजारभाव चालू आहे. त्यात मागच्या तीन दिवसांचा भाव यांच्यातील जो हायेस्ट रेट असेल तो शेतकऱ्यांना दिला जातो. पुढील काही दिवसात बाजारभाव कमी झाला तरी जो मागील तीन चार दिवसात रेट असतो तोच दिला जातो.  

टॅग्स :नाशिकशेतीशेती क्षेत्रशेतकरी