सध्या उन्हाचा तडाखा भयंकर वाढला असून उष्माघाताचा प्रमाण वाढत आहे. पिकांना देखील याचा फटका बसत असून एकीकडे पाणी पातळी घटत चालली असल्याने पुरेसे पाणी देणे कठीण झाले आहे. मात्र हे असताना उन्हाचा तीव्रतेमुळे पिकांवर परिणाम होतो आहे. त्यामुळे उन्हाच्या लाटेपासून पिकांना वाचविण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी यांनी काही उपाय सुचवले आहेत.
काय करावे
उभ्या पिकांना हलके व वारंवार सिंचन द्या.पीके जस-जसे मोठी वाढतात त्याप्रमाणे पाण्याची आवश्यकता असते ते पूर्ण करण्या करीता सिंचनाची वारंवारता वाढवा.मातीतील ओलावा वाचवण्यासाठी कमी कर्ष्याकरीता पिकाचे अवशेष, पेंढा / पॉलिथीन / गवतांचा मल्चिग म्हणून वापर करावा.फक्त संध्याकाळी किंवा अगदी सकाळच्या वेळी (ऊन क्डक होण्यापूर्वी) पाणी द्यावे.जर आपला भाग उष्ण लहर (लू) चा प्रवन चे क्षेत्र असेल तर शिंपडने पध्द्तीचे (स्प्रिंकलर) सिंचनाचा वापर करावा आणि वारा / निवारा चे ब्रेक उपयोगात आणावे.
पशुसंवर्धनाच्या संरक्षणासाठी काय करावे
पशुधन सावलीत ठेवा आणि पिण्यास भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या.पशुधनाकडून सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 दरम्यान काम करून घेवु नये.पेंढाच्या (गवत) मदतीने शेडचे छप्पर झाकून ठेवावे, तापमान कमी करण्यासाठी त्यास पांढरा रंग द्यावा किंवा शेण-चिखलसह थर द्यावा. शेडमध्ये पंखे, वॉटरस्प्रे आणि फॉगर्स वापरावे.तीव्र उष्णते दरम्यान, पाणी फवारणी करावी आणि गोठ्याजवळच थंड पाण्यासाठी सोय करावीत्यांना हिरवे गवत, प्रथिनेयुक्त, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य द्यावे.जनावरे सकाळी किंवा सायंकाळी चरावयास न्यावे.कुकुट पालन शेडमध्ये पडद्यांचा वापर करावा आणि व्यवस्थित हवा खेळती राहील, ह्याची काळजी घ्यावी.