Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : शेतकऱ्यांनो! 'हा' व्हाट्सऍप क्रमांक सेव्ह करून ठेवा, कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन 

Agriculture News : शेतकऱ्यांनो! 'हा' व्हाट्सऍप क्रमांक सेव्ह करून ठेवा, कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन 

Latest News whatsapp number implemented to solve problems of farmers department of agriculture | Agriculture News : शेतकऱ्यांनो! 'हा' व्हाट्सऍप क्रमांक सेव्ह करून ठेवा, कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन 

Agriculture News : शेतकऱ्यांनो! 'हा' व्हाट्सऍप क्रमांक सेव्ह करून ठेवा, कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन 

Agriculture News : शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाकडून व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. 

Agriculture News : शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाकडून व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : खरीप हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग सुरु आहे. अनेक चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरिपासाठी लागणाऱ्या बियाणांची तजवीज करण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरु आहे. अशात खरीप हंगामात शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाकडून व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक  (Whatsapp Helpline Number) सुरु करण्यात आला आहे. 

खरीप हंगामाच्या (Kharif Season) तोंडावर पूर्वमशागत करण्यास सुरवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असले तरीही मात्र सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी (Cultivation) तयारीत असून समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पेरणीला खऱ्या अर्थाने सुरवात होईल. मात्र तोपर्यंत बी बियाणे खते आदींची खरेदी शेतकरी वर्गाकडून सुरु आहे. या काळात शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि तक्रारीसाठी कृषी खात्याकडून 9822446655 हा मदत क्रमांक सुरु करण्यात आला आहे. इथे शेतकऱ्यांना तक्रार करता येणार आहे. 

शेतकरी बी बियाणे खते खरेदी करताना अनेकदा फसवणुकीच्या घटना घडतात. खत - बियाणे विक्री करणारी केंद्रे विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्याची सक्ती करत असतील, चढ्या भावाने विक्री होत असेल, तसेच बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या खरेदीबाबत शेतकरी बांधवांची काही तक्रार असेल तर ती 9822446655 या व्हाट्सऍप क्रमांकावर उपलब्ध असलेल्या पुराव्यासह पाठवावी; त्यावर शहानिशा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल, तसेच तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. 

Web Title: Latest News whatsapp number implemented to solve problems of farmers department of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.