Wheat Farming : एकीकडे यंदा ऑक्टोबर महिन्यात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने रब्बी हंगाम लांबणीवर (Rabbi Season) पडण्याची शक्यता आहे. सध्या खरिपातील पिकांची काढणी सुरु असल्याने हळूहळू शेतकरी रब्बी हंगामातील पिकांच्या नियोजनाला लागले आहेत. रब्बी हंगामात गहू पिकाच्या पेरणीसाठी अनेक गोष्टीना प्राधान्य द्यावे लागते, या लेखातून समजून घेऊया....
बागायती गहू पिकाचे (Wheat Farming) नियोजन करावे. त्यासाठी भारी व खोल जमीन निवडून पूर्व मशागत करणे, जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंद व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत. जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर कोरडवाहू क्षेत्रातील गव्हाची पेरणी ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पेरणी २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान करावी. संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
कोरडवाहू आणि मर्यादित सिंचनासाठी सुधारित जाती
सरबती जाती (जिरायती / कोरडवाहू) - एन.आय.ए. डब्लू. १४१५ (नेत्रावती) सरबती जाती (मर्यादित सिंचन) एन.आय.ए.डब्लू. १९९४ (फुले समाधान), एन.आय.ए.डब्लू. ३६२४ (फुले वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळ विणाऱ्या जिवाणू अनुपम), एन.आय.ए.डब्लू. ३१७० (फुले सात्विक), एन. आय. ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती) बन्सी जात (कोरडवाहू) एम. एम.ए.सी.एस.४०२८, एन.आय.डी.डब्लू. १९४९, एम.ए.सी.एस.४०५८ तांबेरा प्रतिकारक- ए.के.डी.डब्लू २९९७-१६ (शरद).
बियाणे संवर्धकाची बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम (७५ टक्के डब्लू. एस.) ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. बियाणे संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. पेरणी ५ ते ६ सेंमी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळीत २० सेंमी अंतर ठेवून करावी. पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी, म्हणजे आंतरमशागत करता येते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा, म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते.
- ग्रामीण मौसम कृषी सेवा केंद्र आणि विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी