Gahu Perni :शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर वाढत चालला आहे. मजुर टंचाई, वेळेची बचत यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, पेरणी, लागवड (Cultivation) केली जाते. मात्र आजही ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. सध्या रब्बी हंगामातील (Rabbi Season) गहू पिकाची पेरणी केली जात आहे. पारंपरिक गहू पेरणी (Wheat Sowing) नेमकी कशी केली जाते, ते पाहुयात...
गहू हे रब्बी हंगामातील अत्यंत महत्वाचे पीक आहे. त्यामुळे असंख्य शेतकरी गव्हाची पेरणी करतात. सध्या शेतीत आमूलाग्र बदल होत असताना शेती आधुनिक केली जाऊ लागली आहे. यात लागवडीपासून ते काढणीपर्यंत विशेष यंत्राचा वापर केला जातो. मात्र आजही ग्रामीण भागात औत, वखर या पारंपरिक साधनाने शेती केली जाते. तर गहू पेरणी देखील अशाच पारंपरिक अवजारांच्या साहाय्याने केली जात असल्याचे चित्र आहे.
सुरवातीला औताच्या साहाय्याने शेताची नांगरणी केली जाते. नांगरणी केल्यानंतर गव्हाची पेरणी केली जाते. त्यानंतर वखरणी केली जाते. पेरलेले गहू मातीत मिसळण्यासाठी वखराच्या साहाय्याने वखरणी केली जाते.
यानंतरचे महत्वाचे काम म्हणजे सारे ओढले जातात. हे सारे पाणी भरणीसाठी तयार केले जाते. मालपवडे किंवा दाताळच्या साहायाने हे सारे ओढले जातात. गव्हाच्या पेरणीसाठीचे शेवटचे काम असल्याचे शेतकरी सांगतात.
हेही वाचा : Rabi Crop Sowing : रब्बी हंगामात आत्तापर्यंत किती क्षेत्रावर झाल्या पेरण्या?