Wheat Variety : भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR) ने रब्बी हंगामासाठी गव्हाची पेरणी (Wheat Variety) करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गहू HD3410 ही सुधारित गव्हाची जात सादर केली आहे. हे वाण 130 दिवसांत तयार होणारे असून अनेक रोगांशी लढण्यास सक्षम असल्याचे समोर आले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात ही गव्हाची शेतकऱ्यांसाठी उत्तम उत्पादन देणारी ठरणार आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR) ने फेब्रुवारी 2023 मध्ये गव्हाची HD3410 जात लाँच केली होती आणि नंतर केंद्राने पेरणीसाठी मान्यता दिली होती. गव्हाचा हा वाण रब्बी हंगामासाठी योग्य बागायत क्षेत्रात पेरणीसाठी योग्य असेल. कारण, ही वेगाने वाढणारी गव्हाची जात आहे. ही जात गहू पिकामुळे होणाऱ्या अनेक रोगांशी लढण्यास सक्षम आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादनाचा लाभ शेतकऱ्याला मिळतो. गव्हाचा HD3410 वाण केवळ 130 दिवसांत परिपक्व होतो, तर इतर अनेक गव्हाच्या जाती जास्त वेळ घेतात.
या राज्यांमध्ये पेरणी सल्ला
ICAR दिल्लीच्या कृषी शास्त्रज्ञांनी उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांसह योग्य सिंचन क्षेत्रामध्ये HD3410 या जातीची गहू पेरण्याचा सल्ला दिला आहे. गहू HD3410 या जातीला कमी प्रमाणात पाणी लागते, परंतु सिंचनास उशीर होणे रोपासाठी हानिकारक ठरते. त्यामुळेच ज्या भागात कालवे, नद्या, तलाव किंवा कूपनलिका यांची उत्तम व्यवस्था आहे, अशा भागातील शेतकरी या जातीची पेरणी करून बंपर उत्पादन मिळवू शकतात. या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने बाजारात त्याची मागणीही जास्त आहे. याशिवाय ही जात लवकर पेरणीसाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते.
अनेक रोगांशी लढण्याची क्षमता
भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) नुसार, गव्हाची ही जात अवघ्या 130 दिवसांत तयार होते. तर इतर गहू पिकांना 145 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. या जातीच्या झाडांची उंची कमी राहते. या जातीची वनस्पती 100-105 सेमी उंचीपर्यंत वाढते. लवकर परिपक्वता आणि अनेक रोगांशी लढण्याची क्षमता यामुळे ही जात शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. त्याच्या पिठापासून ब्रेड, बिस्किटे आणि चांगल्या प्रतीचे पीठ तयार केले जाते. त्यात प्रथिने, लोह आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असल्याने बाजारात याला मोठी मागणी आहे.