Lokmat Agro >शेतशिवार > मोसंबी व संत्रामध्ये पानगळ, फळगळ समस्या आणि उपाय

मोसंबी व संत्रामध्ये पानगळ, फळगळ समस्या आणि उपाय

Leaf drop, Fruit drop problems and remedies in sweet lime and Orange | मोसंबी व संत्रामध्ये पानगळ, फळगळ समस्या आणि उपाय

मोसंबी व संत्रामध्ये पानगळ, फळगळ समस्या आणि उपाय

मोसंबीचे नर्सरीमधील पाने आकाराने मोठे असल्याकारणाने त्यावर पाणी साठून त्यावर कथ्या रंगाचे डाग म्हणजे 'फायटोफ्थोरा' बुरशीची लागण तसेच 'कोलेटोट्रीकम' बुरशीचे गोल रिंग संतत येणाऱ्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे वाढत असलेले निदर्शनात येत आहे.

मोसंबीचे नर्सरीमधील पाने आकाराने मोठे असल्याकारणाने त्यावर पाणी साठून त्यावर कथ्या रंगाचे डाग म्हणजे 'फायटोफ्थोरा' बुरशीची लागण तसेच 'कोलेटोट्रीकम' बुरशीचे गोल रिंग संतत येणाऱ्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे वाढत असलेले निदर्शनात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नर्सरीमध्ये व मोसंबी बागेत फळगळ आणि पानावर डाग त्यामुळे पानगळ सुद्धा आढळून येत आहे. मोसंबी पिकावर म्हणजे नर्सरी मधील पानावर तांबूस रंगाचे व गोलाकार ठिपके आढळून येत आहे. मोसंबीचे नर्सरीमधील पाने आकाराने मोठे असल्याकारणाने त्यावर पाणी साठून त्यावर कथ्या रंगाचे डाग म्हणजे 'फायटोफ्थोरा' बुरशीची लागण तसेच 'कोलेटोट्रीकम' बुरशीचे गोल रिंग संतत येणाऱ्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे वाढत असलेले निदर्शनात येत आहे.

प्रसार

झाडांच्या पानांवर ५ ते ६ तास पाणी साचून राहिल्यास या दोन्ही बुरशीची लागण प्रथम नर्सरीमधून होते. परिणामी, पानगळ होऊन त्यातील बुरशीचे कण हवेच्या सहाय्याने मोसंबीच्या बागेला प्रथम व नंतर संत्रा बागेला हानी पोहोचविते. त्यामुळे संत्रा व मोसंबी बागांचे हानी होऊन आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते. दोन वर्षाआधी सुद्धा अशाच प्रकारची फळगळ दिसून आली होती. अलीकडे, नर्सरीमध्ये नागअळीचा प्रादुर्भावही दिसून येत आहे. आर्थिक नुकसान व बागांची हानी टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी याबाबत वेळीच योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नर्सरीमधील मोसंबीच्या झाडांची पाने कथ्थ्या रंगाची होणे, पानांवर कथ्थे डाग तयार होणे, पानांच्या कॉर्नरला कथ्था डाग तयार होणे तसेच गोल रिंग म्हणजेच कोलेटोट्रीकम बुरशीमुळे व फायटोप्थोरा बुरशीमुळे पानांवर कथ्ये डाग तयार होऊन फळगळ व पानगळ होत आहे.

उपाययोजना

  • एलीएट २० ते २५ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा बोरडॅक्स मिक्चर ०.६ टक्के किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्राम किंवा अँझाक्सास्ट्रोबीन + डायफेनकोनाझोल १० मिली आणि कोलेट्रोट्रीकम बुरशीच्या व्यवस्थापनासाठी थायफोनेट मिथाईल (रोको) २० ग्राम किंवा कार्बेडाझीम १० ग्राम (बाव्हीस्टीन) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • नागअळीच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ एस. एल. ५ मिलि किंवा थायमेथोक्झाम २५ डब्लू. जी. ३ ग्राम यांपैकी एक कीटकनाशकाची फवारणी ८ ते १० दिवसांच्या अंतराने करावी.
  • मोसंबी पिकात फळगळ आढळून येत आहे. पूर्व परिपक्व फळांची गळती मोसंबी पिकात आढळून येत आहे. त्या मोसंबी बागेत शेतकऱ्यांनी मोसंबी झाडास ५० ग्राम फेरस सल्फेट, ५० ग्राम झिंक सल्फेट व व किलो गांडूळ खत एकमेकात मिसळून जमिनीतून द्यावे.
  • सततचा पाऊस किंवा पावसाचा खंड अथवा उघाड पडल्यास जिब्रेलिक आम्ल १.५ ग्राम कॅल्शियम नायट्रेट दीड किलो १०० लिटर पाण्यात मिसळून त्याची मोसंबी बागेत उघाडीत फवारणी करावी.
     

डॉ. प्रदीप दवणे (कीटकशास्त्रज्ञ) व डॉ. एकता बागडे (कीटकशास्त्रज्ञ)
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, काटोल, जिल्हा नागपूर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
९६०४०६७७०४

 

Web Title: Leaf drop, Fruit drop problems and remedies in sweet lime and Orange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.