Join us

बँकेतील नोकरी सोडून शेती, प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 3:45 PM

आजोबा शेतकरी असल्याने शेतीची आवड लहानपणापासूनच होती. निव्वळ आवडीमुळेच बँकेतील उच्चपद व चांगल्या पगाराची नोकरी सोडून लांजा तालुक्यातील खानवली येथील अद्वैत पाटकर सध्या पूर्णवेळ शेतीमध्ये रमले आहेत.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : आजोबा शेतकरी असल्याने शेतीची आवड लहानपणापासूनच होती. निव्वळ आवडीमुळेच बँकेतील उच्चपद व चांगल्या पगाराची नोकरी सोडून लांजा तालुक्यातील खानवली येथील अद्वैत पाटकर सध्या पूर्णवेळ शेतीमध्ये रमले आहेत.

शेतमालाचा दर्जा वाढविणे, शेतमालावर प्रक्रिया करून नवनवीन उत्पादन तयार करण्यात ते व्यस्त झाले आहेत. शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घेत प्रक्रिया व्यवसाय सुरू केला. त्याद्वारे ते ४० प्रकारची उत्पादने तयार करतात.

आंबा, फणस, कोकमपासून पोळी, तळलेले गरे, लोणची, सरबत, आगळ तयार करून विक्री करतात. पाटकर कुटुंबीयांची ४० एकर शेती असून, त्यामध्ये ६०० आंबा, ५०० सुपारी, २०० काजू, १५० नारळ, ३५ कोकम, ४० फणसाची लागवड आहे.

सुरुवातीच्या आंब्याला दर चांगला मिळतो. मात्र बाजारात आवक वाढली की दर गडगडतात. अशावेळी होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली तर तयार होणाऱ्या उत्पादनांना बाजारात मागणी चांगली असून दरही उत्तम मिळतो. निव्वळ याच उद्देशातून अद्वैत यांनी उद्योग सुरू केला असून, रोजगाराची उपलब्धता झाली आहे.

आजोबा, वडील शेती करत असल्याने शेतीची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली. नवीन लागवड, जुन्या झाडांचे संगोपन करत असतानाच शेतमालावर प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. बाजारात त्याला मागणीही उत्तम आहे. लोणची, गरे, सरबत, पोळी, आगळ विक्रीतून १८ ते २० लाखांचा व्यवसाय होतो शिवाय कायमस्वरूपी ८ ते ९ लोकांना रोजगार मिळाला आहे. - अद्वैत पाटकर

अधिक वाचा: उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा

टॅग्स :शेतकरीशेतीपीककोकणआंबाकाढणी पश्चात तंत्रज्ञानअन्न