Lokmat Agro >शेतशिवार > leopards in Farm: जुन्नर बागायती परिसर बनला बिबट्यांचा 'अधिवास'; शेती होतेय दहशतीत

leopards in Farm: जुन्नर बागायती परिसर बनला बिबट्यांचा 'अधिवास'; शेती होतेय दहशतीत

leopards in farm: Junnar horticultural area becomes 'habitat' of leopards | leopards in Farm: जुन्नर बागायती परिसर बनला बिबट्यांचा 'अधिवास'; शेती होतेय दहशतीत

leopards in Farm: जुन्नर बागायती परिसर बनला बिबट्यांचा 'अधिवास'; शेती होतेय दहशतीत

Leopards habitat affecting farming: बिबट्याचा वावर शेती आणि ग्रामीण भागात वाढत असून शेतकऱ्यांसाठी एक समस्या होऊन बसली आहे.

Leopards habitat affecting farming: बिबट्याचा वावर शेती आणि ग्रामीण भागात वाढत असून शेतकऱ्यांसाठी एक समस्या होऊन बसली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जुन्नर तालुक्यातील जंगल हे नैसर्गिक अधिवास असले तरी बिबट्या आता सैरभैर झाला आहे. विशेषतः नदीकाठच्या ऊसशेतीत अनेक गावांत बिबट्याचे दर्शन आता नवीन राहिलेले नाही. बिबट्यांची वाढती संख्या, ऊस शेतीत त्यांचा वाढता वावर यातून ऊसशेती आता बिबट्यांसाठी उत्पत्तीस्थाने बनू लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन्यजीव अभ्यासकांतून याला दुजोरा देण्यात येतो आहे. खरे तर वाढते प्रजनन बिबट्याला निसर्गतः एकावेळी दोन बछडे होतात; पण अनुकूल परिस्थितीमुळे उसाच्या शेतात त्यांना तीन तीन बछडे होतात. पूर्वी जंगलात पुरेसे अन्न आणि अधिवास या बिबट्यांसाठी उपलब्ध होत होता. नंतर हे चित्र बदलत गेले. बिबट्यांचे अन्न असलेल्या लहान वन्यजीवांच्या प्रमाणदेखील कमी झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात वाढती जंगलतोड त्यामुळे वनसंपदा नष्ट होत आहे त्यामुळे यातूनच बिबट्या बाहेर पडला. बागायती टापू आता बिबट्यांसाठी नवा 'हॅबिटॅट' बनला आहे.

वर्षानुवर्षे जंगलात सुखेनैव नांदणारे बिबटे मात्र विविध कारणांनी बिबट्यांची संख्या जंगलात सातत्याने घटू लागली आहे. नदीकाठच्या ऊसशेतीत मात्र अनेक गावांत बिबट्यांचे दर्शन सातत्याने होत आहे. जंगल हे खरे बिबट्याचा नैसर्गिक अधिवास, मात्र या भागातून आता बिबटे मोठ्या संख्येने अन्नाच्या शोधात बाहेर पडून उसात आदिवास करताना पाहायला मिळत आहेत. भक्ष्याच्या शोधात थेट मानवी वस्तीत, शेतशिवारात शिरकाव करत आहेत. बिबटे जंगलाबाहेर का ? मात्र आता या जंगलात अपवादानेच बिबट्या दिसतो. अन्न पाणी, निवारा, प्रजोत्पादन आणि सुरक्षित जागा मिळत नसल्यानेच खरे तर बिबटे आता जंगलाबाहेर पडू लागले आहेत.

संबंधित व्हिडिओ

 

बिबट्याची माणसांवर हल्ले वाढू लागले पूर्वी बिबटे जंगलातच आढळायचे. आता ऊसशेतीकडे आश्रयासाठी धाव घेत आहेत. जुन्नर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. मानवी वस्तीत या प्राण्यांचा झालेला शिरकाव आता मानवाच्या जिवावर बेतू लागला आहे. अन्नाच्या शोधात सैरभैर भटकणारे बिबट्या आता मानवालाच भक्ष्य करू लागले आहेत. गेल्या काही महिन्यात या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, यावर कोणताही ठोस पर्याय निघालेला नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ म्हणाले सांगा आम्ही कसे जगायचं? असा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

 

नागरिकांत भीतीचे वातावरण
शेती कसण्यालाही येताहेत मर्यादा एरव्ही जंगल भागातच दिसणारा बिबट्या गावाचा शेतशिवारात येत तो हल्ली लोकांचा पाहुणा झाला. त्यातच शेतातील उभ्या पिकांत धुडगूस घालत तो शेतीच्या मुळावरच बसला. नुकसान परवडले; पण त्याचा जीविताशी खेळ नको म्हणून येथील शेतकरी दबकतच शेती करू लागला आहे. अलीकडील काही दिवसात दहशतीत भीतीच्या छायेखाली असणाऱ्या मांडवी खोऱ्यात बिबट्याचाही वावर वाढतोय हे निश्चित झाले; मात्र एकूणच परिस्थितीत रात्री अपरात्री सोडा; पण दिवसाही एकटे दुकटे शेताकडे जाणे म्हणजे धोक्याला आपसूकच कवटाळणे असा प्रकार झाला असून लोकांसमोरील भीतीचा अंधार अधिकच गडद झालेला दिसून येत आहे.

सुरक्षित अधिवासावर परिणाम 
बिबट्याच्या हल्ल्याने झालेल्या दुर्घटना ताज्या असतानाच दोन दिवसांपूर्वी रोहोकडी येथील काही शेतकऱ्याना दिवसा बिबट्या दिसणे, पिल्ले शेतात सोडून जाणे, सायंकाळी मेंढपाळाच्या मेंढ्यांवर हल्ला करणे, बिबट्याकडून झालेला हल्ल्याने परिसरातील त्याच्या अस्तित्वाची चाहूल करून दिली आहे. जंगल क्षेत्रात वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे, तर वणव्यांसारख्या प्रकारांनी त्यांच्या सुरक्षित अधिवासावर परिणाम झाला आहे.

त्यामुळे शेतशिवारात ठाण मांडत असल्याने लोकांची चिंता वाढत आहे. मुळातच येथील शेती ही डोंगरपायथ्याशी असल्याने वानर, माकडे,पक्षी यापासून शेतीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यातच हिंस्र श्वापद असणाऱ्या बिबट्याच्या वावराने लोकांना स्वतःची सुरक्षा राखण्यासाठी अधिकची सावधानता बाळगावी लागत आहे.

फोटो - दिवसाढवळ्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या. (फोटो - २७ ओतूर बिबट्या)

Web Title: leopards in farm: Junnar horticultural area becomes 'habitat' of leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.