Join us

कारखाने कमी, गाळप क्षमता कमीच: यंदा ऊस हंगाम लवकर संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:04 AM

कारखाने कमी, गाळप क्षमताही कमीच. मात्र, गाळपात पुणे प्रादेशिक विभाग राज्यात आघाडीवर आहे. सर्वाधिक ४५ कारखान्यांचे गाळप सुरू असलेला सोलापूर विभाग दुसऱ्या, तर कोल्हापूर विभाग गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कारखाने कमी, गाळप क्षमताही कमीच. मात्र, गाळपात पुणे प्रादेशिक विभाग राज्यात आघाडीवर आहे. सर्वाधिक ४५ कारखान्यांचे गाळप सुरू असलेला सोलापूर विभाग दुसऱ्या, तर कोल्हापूर विभाग गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला असला तरी ग्रामपंचायत निवडणुका, दिवाळी दराच्या आंदोलनामुळे ऊस गाळपावर कमालीचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. त्यातच वजन काट्याबाबत संशय, दरवर्षीच दर कमी देणे, दर वाढ मागणाऱ्या शेतकऱ्यांना कारखानदारी परवडत नसल्याचे सांगणे, कमी दराशिवाय त्याचेही पैसे वेळेवर न देणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस देण्याचे शेतकरी टाळत असल्याचाही गाळपावर परिणाम झाला आहे.

राज्यात सध्या १९० साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या सर्वच कारखान्यांनी २ कोटी ७६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केला असून २३० लाखांपर्यंत क्विंटल साखर तयार झाली आहे. सव्वा महिन्याच्या गाळपाचा साखर उतारा ८.३४ टक्के इतकाच पडला आहे.

सोलापूर विभागात ६१ लाख, तर पुणे विभागात ६५ लाख मे. टन गाळपसोलापूर विभागसोलापूर व धाराशिव जिल्ह्यात ४५ साखर कारखान्यांची प्रति दिन एक लाख ८२ हजार ३५० मेट्रिक टन गाळप क्षमता असून ६१ लाख २२ हजार मेट्रिक टन गाळप तर ४७ लाख १३ हजार क्विंटल साखर तयार झाली तर साखर उतारा अवघा ७.७ टक्के इतकाच आहे. पुणे विभागातील पुणे व सातारा जिल्ह्यात २९ साखर कारखान्यांची प्रति दिन एक लाख ९७ हजार ४५० मेट्रिक टन गाळप क्षमता असून आतापर्यंत ६५ लाख ४४ हजार मेट्रिक टन गाळप झाले, तर ५५.९३ लाख क्विंटल साखर व ८.५५ टक्के उतारा पडला.कोल्हापूर विभागकोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ३६ साखर कारखान्यांची दोन लाख १५ हजार गाळप क्षमता असून आतापर्यंत ५३ लाख ७३ हजार मेट्रिक टन ऊस गाळपातून ५०.६४ लाख क्विंटल साखर तर ९.४२ टक्के उतारा पडला आहे.अहमदनगर विभागअहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांची एक लाख ८ हजार मेट्रिक टन प्रति दिन गाळप क्षमता असून आतापर्यंत ३५ लाख ६८ हजार मेट्रिक टन गाळपातून २९.४९ लाख क्विंटल साखर व ८.२७ टक्के साखर उतारा मिळाला आहे.नांदेड विभागकारखान्यांची प्रति दिन ९५ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असताना ३१. ५५ लाख क्विंटल साखर व ८.३८ टक्के उतारा पडला आहे.छत्रपती संभाजीनगरविभागातील २२ कारखान्यांची ८५ हजार गाळप क्षमता असताना २५.२८ लाख मेट्रिक टन गाळपातून १८ लाख क्विंटल साखर व ७.१६ टक्के साखर उतारा पडला आहे.मागील वर्षी १९५ साखर कारखान्यांनी ३४८ लाख मेट्रिक टन गाळप केले होते.

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीसोलापूरपुणेकोल्हापूर