आयआयटी मुंबईकडून बैठकाद्वारे केले जातेय मार्गदर्शननानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आयआयटी मुंबई यांच्याअंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी पाण्याचा ताळेबंद, विजेच्या नियोजित वापराचे शेतकऱ्यांना धडे दिले जात आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांना आगामी काळात होणार आहे.
खरीप हंगामाच्या शेवटी व रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी कृषी खाते, महावितरण, इतर शेती निगडित कर्मचारी व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेती प्रश्नांवर चर्चा केली. त्या आधारे रब्बी हंगामासाठी आयआयटी मुंबईमार्फत तयार केलेले गाव विकास आराखडा म्हणजे 'पाण्याचा ताळेबंद' गणितीय मॉडेल तसेच 'रोहित्र पर्याप्तता अंदाज साधन आशा साधनांचा उपयोग करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात निपाणी जवळका, बाभळखूंटा, लिम्बा, कारेगाव, हिवरगव्हाण, एकुरका या ६ गावांत पीक-पाणी, तर तिगाव, एकुरका, पिंपळवंडी, बागपिंपळगाव, रुई आणि शिवणी या ६ गावांत वीज विषयासाठी डॉ. हेमंत बेलसरे, देवानंद डोईफोडे व टीम काम करत आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
२५० शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्वेक्षण
१. मागील चार महिन्यांत निवडलेल्या गावामध्ये १ प्राथमिक बैठक, शिवार फेन्या, पर्जन्यमापक बसविणे व त्याद्वारे रोजचा पाऊस मोजणे, निवडक रोहित्रांवर कॅपॅसिटर बसवणे व वीज व्यवस्थेत होणारी M सुधारणा तपासणे, तसेच गाव क्षेत्रानुसार प्रत्येक गावातील ३०-४० वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत असणाऱ्या एकूण २५० शेतकयांच्या बांधावर जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर मुंबई आयआयटीच्या टीमने त्याचा अभ्यास केला.
२. सर्वेक्षणामध्ये गावातील पीकपद्धती, पीक- पाण्याचे स्रोत, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती, शेतीसाठी लागणाच्या विद्युत रोहित्रांची संख्या व सद्य:स्थिती, शेतकयांचे उत्पादन व त्यासाठी येणारा खर्च, शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या इतर वन्यप्राण्यांचा त्रास समस्यांची नोंद घेण्यात आली. या नोंदीचे संकलन व विश्लेषण रब्बी हंगाम बैठकात शेतकऱ्यांसमोर मांडण्यात येत असून त्यांना सल्ले दिले जात आहेत.