पिकांवरील खोड कीडा प्रादुर्भावावर वेळीच मात करण्यासाठी कृषी खात्याकडून शेतीशाळांचे आयोजन जिल्ह्यातील गावखेड्यात सध्या करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने खोडकीड संपवणाऱ्या लघु अभ्यासाचे धडे शेतकऱ्यांना दिले जात असल्याचे वास्तव जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी सांगितले.
खोडकिडा पतंग पिवळसर नारंगी रंगाचा असून, मादी पतंगाच्या पंखावर काळा ठिपका असतो. नर पतंगाच्या पंखावर काळा ठिपका नसतो. या खोडकिडीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रारंभी जमिनीची खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे खोडकिडीचे कोष मरतात व पक्षी उघडे झालेले खोडकिड्यांचे कोष खातात. त्यामुळे नियंत्रण होते. लागवडीवेळी रोपांचे शेंडे खुडावेत, भात कापणी करताना जमिनीलगत कापणी करावी, यासाठी वैभव विळ्याचा वापर करावा.
कामगंध सापळे वापर
एकरी ८ कामगंध सापळे शेतात लावावेत, असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना या शेतीशाळेत दिले जात आहे.
रासायनिक नियंत्रण
कारटॅप हायड्रोक्लोराइड ४ टक्के दाणेदार १८८ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रोनीलीपोल ० ४ टक्के दाणेदार ९०० ग्रॅम किंवा फिप्रोनिल ०.३ टक्के दाणेदार २०८ ग्रॅम प्रतिगुंठा या प्रमाणात जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे, आदी धडे जिल्ह्यातील बळीराजाला दिले जात आहेत.