Lokmat Agro >शेतशिवार > ऊस गाळप हंगाम सुरू करू द्या; कोल्हापुरातील साखर कारखान्यांची मागणी

ऊस गाळप हंगाम सुरू करू द्या; कोल्हापुरातील साखर कारखान्यांची मागणी

Let the start sugarcane crushing season; Demand for sugar mills in Kolhapur | ऊस गाळप हंगाम सुरू करू द्या; कोल्हापुरातील साखर कारखान्यांची मागणी

ऊस गाळप हंगाम सुरू करू द्या; कोल्हापुरातील साखर कारखान्यांची मागणी

हंगाम वेळेत सुरू झाला नाही तर तोडणी कामगार राहणे अडचणीचे ठरणार आहे. सर्वच घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हंगाम वेळेत सुरू झाला नाही तर तोडणी कामगार राहणे अडचणीचे ठरणार आहे. सर्वच घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कारखान्यांचा हिशेब व ताळेबंद पाहता मागील हंगामातील गाळप झालेल्या उसापोटी सद्य:स्थितीत कारखान्यांकडे रक्कम देण्यासाठी कोणतीही शिल्लक नाही. याबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे भूमिका मांडण्यात आली आहे. हंगाम वेळेत सुरू झाला नाही तर तोडणी कामगार राहणे अडचणीचे ठरणार आहे. सर्वच घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

३१०० रुपये देण्याचे मान्य
'जवाहर'सह 'दत्त', 'पंचगंगा', 'शरद' व गुरुदत्त' या कारखान्यांच्या व्यवस्थापनाने पालकमंत्री हसन मुश्रीफजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे साकडे घातले आहे. यावर्षीच्या हंगामासाठी २९५० ते ३००० इतकी 'एफआरपी ची रक्कम निघत असताना शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कारखान्यांनी एक पाऊल पुढे टाकत जाहीर केलेल्या ३००० दराऐवजी यावर्षी गाळपास येणाऱ्या उसासाठी ३१०० रुपये देण्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून बंद असलेल्या शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करू द्यावा, अशीही मागणी कारखाना व्यवस्थापनाने केली आहे.

Web Title: Let the start sugarcane crushing season; Demand for sugar mills in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.