Join us

पशुधनांच्या वासरांनाही लम्पीचे लसीकरण केले जाणार

By बिभिषण बागल | Published: August 19, 2023 1:39 PM

पशुधनाच्या वासरांना वयाच्या ४ ते ६ महिने दरम्यान लसीकरण करावे व लसीकरण न केलेल्या पशुधनाच्या वासरांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लसीकरण करण्यात यावे.

केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचना आवृत्ती ३.० अंतर्गत (अ) Carpet Vaccination मधील मुद्दा क्र. (७) नुसार बाधीत किंवा लसिकरण केलेल्या पशुधनाच्या वासरांना वयाच्या ४ ते ६ महिने दरम्यान लसीकरण करावे व लसीकरण न केलेल्या पशुधनाच्या वासरांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लसीकरण करण्यात यावे, असे नमुद आहे. या बाबत दि. २८.१०.२०२२ रोजी आयोजित राज्यस्तरीय कृती दलाच्या बैठकीत निश्चित झाल्यानुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करणे अभिप्रेत आहे.

  • लम्पी चर्म रोग प्रतिबंधात्मक लसीकरण न झालेल्या गायीपासून झालेल्या वासरास वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लसीकरण करावयाचे आहे. याकरीता सर्वप्रथम अशा वासरांचा तपशिल संस्थाप्रमुखाने तयार करावा.
  • तसेच, कार्यक्षेत्रातील गाभण गायी अथवा लसीकरण करण्याचे राहिलेले पशुधन व उपरोक्त नमुद वासरे यांचा अंदाज घेऊन लसीकरणाचे नियोजन करुन लसमात्राम्चा सयोग्य वापर होईल. याची दक्षता घ्यावी.
  • लसीकरण दरम्यान प्रत्येक जनावरासाठी नवीन सुईचा वापर करावा.

तसेच, उपचार होऊन बरे झालेल्या काही बाधित पशुधनात काही दिवसांनंतर मरतुक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशाप्रकारे मरतुक आढळून आलेल्या पशुधनातील काही पशुधनांचे महाविद्यालयीन तज्ञांद्वारे शवविच्छेदन करून मरतुकीबाबत विस्तृत तपास करण्यात यावा. तसा अहवाल या रोग अन्वेषण विभाग, पुणे यांना (dis.pune 7@gmail.com) सादर करण्यात यावा. 

टॅग्स :लम्पी त्वचारोगगायशेतकरीसरकार