Join us

पशुधन घटले, ग्रामीण भागात शेणखताचा तुटवडा.. मिळतोय चांगला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 3:45 PM

शेतकरी शेतीचा पोत वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करतात. मात्र अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घटत असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. 

ग्रामीण भागात पारंपरिक शेती, फळबाग लागवड, फुलशेती करण्यावर भर देण्यात येतो. यासाठी नैसर्गिक किंवा रासायनिक खते वापरली जातात. सध्या बहुतांश ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली जात असल्याने शेतीसाठी सांभाळल्या जाणाऱ्या पशुधनाची संख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे, परिणामी शेणखताचा तुटवडा जाणवत आहे.

शेतकरी शेतीचा पोत वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करतात. मात्र अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घटत असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. 

शेतकरी शेतीसाठी गाय, म्हैस, बैल यांचा वापर कमी करू लागला आहे. तसेच घरोघरी मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे. त्यातच जनावरांच्या किमतीही वाढल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. चाऱ्याचे वाढते भाव व पाणीटंचाईमुळे शेतकरी पशुपालन करण्यास टाळत आहेत.

त्यामुळे सध्या शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. काही शेतकऱ्यांकडे साठा आहे, ते हजारो रुपयात विक्री करताहेत. मात्र हा भाव देऊनही मुबलक प्रमाणात खत मिळण्याची खात्री नाही.

राज्यात सेंद्रिय खताबाबत जनजागृती- राज्यात सेंद्रिय खताबाबत जनजागृती करण्यात येत आहे. दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा भासत आहे.- काही मोजके शेतकरी शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत आदी सेंद्रिय खतांचा वापर करतात. मोठे शेतकरी प्रत्येक तीन वर्षांनी शेतात शेणखत टाकतात.- काही शेतकरी जमिनीची सुपीकता वाढावी म्हणून तळ्यातील गाळ किंवा नदीकाठची तांबडी माती आणून त्याचा वापर करीत आहेत.

प्रति ट्रॉली शेणखताची विक्रीहल्ली ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध आहे, ते स्वतःच्या शेतात टाकण्यास प्राधान्य देतात. त्यांची गरज भागल्यास शेणखताची विक्री करतात. त्यामुळे शेतकरी शेणखताच्या शोधात आहेत. काही शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली आहे, त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे. ३ ते ३,६०० रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉली दराने सध्या शेणखताची विक्री सुरू आहे.

अधिक वाचा: Ploughing जमीन का नांगरावी? काय आहेत फायदे

टॅग्स :सेंद्रिय खतशेतीशेतकरीपीकफलोत्पादनफुलशेतीखते