पुणे :पुणे येथे भारतातील किसान शेतकरी प्रदर्शन १३ ते १७ डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना अनेक गोष्टींचे दर्शन झाले असून राज्यभरातील आणि परराज्यातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी लोकमत कडून शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या बातम्या वाचायला मिळतात आणि त्याचा आम्हाला फायदा होतो अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, पुण्यात भरलेल्या किसान कृषी प्रदर्शनासाठी पूर्ण पाच दिवसांमध्ये जवळपास २ ते ३ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा, उत्पादने, नवे तंत्रज्ञान पाहायला मिळाले. त्याचबरोबर शेतीत काम करण्यासाठी वापरात येणारे अनेक औजारे खरेदीसुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे.
लोकमत ॲग्रो ठरलं आकर्षण
शेतकरी लोकमतशी जोडले जावेत आणि लोकमतच्या शेती संबंधित बातम्या शेतकऱ्यांना सोप्या भाषेत वाचायला मिळाव्यात, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या बातम्या आवश्यक असतात, वेगवेगळ्या भागांतील शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी लोकमत ॲग्रोने किसान प्रदर्शनात विशेष मोहीम राबवली होती. या माध्यमातून लोकमत ॲग्रो हे शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले.
लोकमत ॲग्रोच्या बातम्यांमुळे होतो फायदा
लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून हवामान, बाजारभाव, यशोगाथा आणि शेतीशी निगडीत सोप्या भाषेत माहिती आणि बातम्यांची सेवा दिली जाते. या बातम्यामुळे आम्हाला फायदा होतो आणि मोठे नुकसान टळते अशी प्रतिक्रिया किसान प्रदर्शनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान अंदाजामुळे शेतमालाचे होणारे नुकसान टळते, बदलत्या वातावरणानुसार कोणती फवारणी करावी याचा सल्ला फायद्याचं ठरत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.