Join us

कुंडीतही लावता येते कमळ, कसे? जाणून घ्या..

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 17, 2024 3:02 PM

कमळाच्या बीयांपासून फुलांपर्यंत सगळ्यात आहेत औषधी गुणधर्म, औषधी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कमळाच्या शेतीचं अनन्यसाधारण महत्व..

तलावात आणि इतर ठिकाणी कमळाची फुले तरंगताना आपण अनेकदा पाहिली असतील. पण कमळ आता कुंडीतही लावणं सहज शक्य आहे. मात्र, याची देखभाल काहीशी वेळ देऊन करावी लागणारी असल्याचे सांगितले जाते.

पूर्वी हे काम थोडं अवघड होतं.पण आता हे बरंच सोपं झालंय की काहीजण प्रयोगाचा भाग म्हणून कमळ कॉफी मग मध्येही वाढवू लागले आहेत.

कमळाची कुंडीत लागवड करण्यापूर्वी काही महत्वाच्या बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या रोपवाटिकेतून कमळाचं कंद आणावं लागेल.तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑनलाइनही मागवू शकता. जर रोप योग्य बियाणांपासून उगवले असेल तर तुम्हाला लवकरच पानं आणि कळ्या दिसू लागतील.

कमळाचे फुल उगवेलच पण..

कमळाचा कंद किंवा रोप आणल्यानंतर फुल उगवेलच पण ते किती टिकेल याची शाश्वती नसते. कमळाच्या बीया उगवण्याच्या पद्धतीविषयी सांगायचे झाले तर, त्यासाठी बाजारातून उच्च प्रतीच्या कमळाच्या बीया घ्याव्यात. त्या अंकुरित करा. बीया थोड्या घासून पाण्यात टाकाव्यात. अंकूर फूटल्यावर पाण्यात खोल सोडून द्या. हळूहळू मुळं वाढून फुले येऊ लागतील.

कमळात आहेत अनेक औषधी गुणधर्म

कमळाची मुळं, बीज आणि फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पचनशक्ती वाढवण्यासह झोपेशी संबंधित समस्या दूर करणे तसेच चिंता दूर करणे यासारख्या कमळाचे विशेष महत्व आहे. कमळाची पाने , बीया आणि मुळांना विशेष औषधी महत्व आहे. औषधी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कमळशेतीला अनन्यसाधारण महत्व आहे.

टॅग्स :बागकाम टिप्सफुलं