Join us

Magel Tyala Shettale : मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांत आणली शेततळीने समृध्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:52 IST

Magel Tyala Shettale: दुष्काळवाडा, टँकरवाडा म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी आता पाण्याबाबत सजग होताना दिसत आहेत. त्यामुळे आता मराठवाड्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी साचवून शेतकरी रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिके शेततळ्यामुळे घेणे शक्य होत आहेत. (Magel Tyala Shettale)

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळवाडा, टँकरवाडा म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी आता पाण्याबाबत सजग होताना दिसत आहेत. (Magel Tyala Shettale)

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साचवून ठेवले तर कोरडवाहू जमिनीवर रब्बी आणि उन्हाळी हंगामातही पिके घेता येतात, हे लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगरसह लगतच्या बीड आणि जालना अशा तीन जिल्ह्यांत मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी २ हजार ६१६ शेततळी खोदली आहेत. (Magel Tyala Shettale)

मराठवाड्यातील ७५ टक्के शेती केवळ खरीप हंगामातच कसली जाते. कारण रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी कायम पाण्याची सुविधा शेतकऱ्यांकडे नसते.

सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी विभागाने अनुदानावर 'मागेल त्याला शेततळे' योजना (Magel Tyala Shettale) आणली होती. यानंतर २०२२ साली या योजनेचे रूपांतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी विकास योजना असे करण्यात आले.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत (Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme) शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी १५ हजार, तर जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. पूर्वी शेततळ्याच्या अनुदानाची मर्यादा ५० हजार रुपये होती.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ हजार ४९, जालना जिल्ह्यात १ हजार २३३ तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३३४ असे एकूण २,६१६ शेततळी खोदण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शासनाने आतापर्यंत १९ कोटी ६७ लाख ३३ हजार रुपयांचे अनुदान अदा करण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून मिळाली.

लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड

कृषी विभागाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर शेततळ्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. यानंतर शेतकऱ्यांनी विहित आकाराचे शेततळे खोदावे लागते. शेततळे खोदल्याची पडताळणी कृषीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते.

शेततळ्याच्या प्लास्टिक पन्नीसाठीही अनुदान

शेतकऱ्याने शेततळे खोदल्यानंतर या त्यात प्लास्टिक पन्नीचे आच्छादन न टाकल्यास शेततळ्यातील पाणी वाहून जाते. परिणामी, अशा शेततळ्याचा उपयोग होत नाही. यामुळे शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी खूप महत्त्वाची असते. ही बाब लक्षात घेऊन शासन पन्नीसाठीही अनुदान देते.

मागेल त्याला शेततळे

७५% शेती मराठवाड्यात पाणीटंचाईमुळे केवळ खरीप हंगामातच कसली जाते. यावर उपाय म्हणून शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना आणली होती. (Magel Tyala Shettale)

हे ही वाचा सविस्तर : MGNREGA: 'मनरेगा'च्या कामगारांना मिळणार हाताला काम वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती