Join us

Maha Us Nondani ऊसक्षेत्राची माहिती १५ जूनपर्यंत भरा नाहीतर गाळपाची परवानगी विसरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:45 AM

साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या 'महा ऊसनोंदणी' या पोर्टलवर सर्व कारखान्यांनी २०२४-२५ गाळप हंगामासाठी त्यांच्याकडे नोंद झालेल्या ऊसक्षेत्राची माहिती १५ जूनपर्यंत भरणे बंधनकारक केले आहे.

साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या 'महा ऊसनोंदणी' या पोर्टलवर सर्व कारखान्यांनी २०२४-२५ गाळप हंगामासाठी त्यांच्याकडे नोंद झालेल्या ऊसक्षेत्राची माहिती १५ जूनपर्यंत भरणे बंधनकारक केले आहे. वेळेत माहिती न भरलेल्या साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाकरिता ऊसगाळप परवाना दिला जाणार नाही, असा इशारा साखर आयुक्तांनी दिला.

राज्यातील गाळप हंगामात ऊस उत्पादन, ऊसगाळप, साखर उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी ऊस नोंद क्षेत्राची माहिती कारखाना कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासदांचे ऊसनोंद क्षेत्र, बिगर सभासदांचे ऊस नोंदक्षेत्र, कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचे करारांतर्गत ऊसनोंद क्षेत्र, राज्याबाहेरील ऊस उत्पादकांच्या करारांतर्गत ऊस नोंद क्षेत्राची माहितीची एकत्रित नोंद करणे आवश्यक आहे.

त्याबाबतच्या सूचनाही कारखान्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता डिजिटायझेशनची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने साखर संचालक राजेश सुरवसे यांनी सर्व सहकारी, खासगी कारखान्यांना ऊस नोंदणीची माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक केले असून, माहिती ऊसनोंदणीच्या संकेतस्थळावर भरायची आहे.

माहिती सर्वप्रथम लॉग-इन करणे आवश्यक आहे. त्यासाठी गाळप परवान्यासाठी जो युजर आयडी व पासवर्ड वापरण्यात येतो, त्याचाच वापर वापर करावा. ऊस नोंदणीची एक्सेल फॉरमॅट डाऊनलोड करून या फॉरमॅटमध्ये कोणताही बदल न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अॅपवर अशी भरा माहितीसर्व आकडे इंग्रजीमध्येच भरणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये मोबाइल नंबर, आधार नंबर, सर्व्हे नंबर, खाते क्रमांक आदींचा समावेश आहे. माहितीतील शेतकऱ्यांची नावे व अन्य माहिती मराठीमध्येच भरायची आहेत. माहिती भरून एक्सेल शीट तयार झाल्यावर प्रथम सेव्ह करून ऊसनोंद माहितीची एक्सेल शीट अपलोड करावी. त्याबाबतची कारखान्यांची कार्यशाळाही आयुक्तालयातर्फे घेण्यात आली आहे.

अधिक वाचा: Sugarcane FRP साखरेचे दरही वाढले आमचे एफआरपीच्या वरील १०० रुपये मिळणार की नाही?

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीमोबाइलसरकारराज्य सरकार