Lokmat Agro >शेतशिवार > ऑनलाईन शेतमाल विक्रीसाठी सरकारकडून महाॲग्रो मार्ट ॲपची सेवा

ऑनलाईन शेतमाल विक्रीसाठी सरकारकडून महाॲग्रो मार्ट ॲपची सेवा

Mahaagro mart app service from Govt to sell farmers goods online | ऑनलाईन शेतमाल विक्रीसाठी सरकारकडून महाॲग्रो मार्ट ॲपची सेवा

ऑनलाईन शेतमाल विक्रीसाठी सरकारकडून महाॲग्रो मार्ट ॲपची सेवा

किसान प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे,

किसान प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे,

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : शेतकऱ्यांना त्यांचा प्रक्रिया केलेला माल ऑनलाईन पद्धतीने विक्री करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून महाअॅग्रो नावाचे ऑनलाईन मार्केटिंग  अॅप विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना डाळी, प्रक्रिया केलेले उत्पादने विक्री करता येणार आहेत. 

दरम्यान, या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित उत्पादने किंवा कृषी निविष्ठा सुद्धा खरेदी करता येणार आहेत. यामुळे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, व्यावसायिक किंवा उत्पादक यांना फायदा होणार असून माल थेट ऑनलाईन पद्धतीने विक्री किंवा खरेदी करता येतो. त्यामुळे उत्पादक आणि शेतकऱ्यांना या अॅपचा फायदा होणार आहे.

कोण होऊ शकतो सहभागी

  • शेतकरी उत्पादक कंपनी
  • शेतकरी उत्पादक संस्था
  • महिला बचत गट
  • व्यावसायिक किंवा उत्पादक

 

अॅपची वैशिष्ट्ये

  • मोठ्या बाजारपेठेचा हिस्सा बनण्याची संधी
  • गुणवत्ता आणि सुरक्षिततेची हमी
  • कार्यक्षम विपणन व्यवस्था
  • सुलभ व तात्काळ नोंदणी

 

दरम्यान, पुण्यातील मोशी येथे सुरू असलेल्या किसान प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कृषी उद्योग विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रदर्शनाचा आज तिसरा दिवस असून अजून दोन दिवस शेतकऱ्यांना हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे. या ठिकाणी शेतीतील नवनवे तंत्रज्ञान, प्रयोग, प्रकल्प पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर शेती उत्पादन कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट भेटण्याची संधी शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत आहे. 

 

Web Title: Mahaagro mart app service from Govt to sell farmers goods online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.