Join us

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या प्रसिद्ध स्ट्रॉबेरीचे क्षेत्र यंदा घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 11:36 AM

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच असून, स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातही अति पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे सध्यातरी स्ट्रॉबेरीची लागण १५ दिवस पुढे गेली आहे.

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात पाऊस सुरूच असून, स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातही अति पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे सध्यातरी स्ट्रॉबेरीची लागण १५ दिवस पुढे गेली आहे.

तसेच वाई, जावळी आणि कोरेगाव तालुक्यांतही पाऊस अधिक झाल्याने नर्सरीतील स्ट्रॉबेरी रोपांनाही रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलाय. यामुळे यावर्षी स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.

महाबळेश्वर हे जागितक पर्यटनस्थळ आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यात येते. येथील स्ट्रॉबेरीची परदेशात निर्यात होते. तसेच देशातील हैदराबाद, अहमदाबाद, बडोदा, दिल्ली, कोलकाता, चेन्नईलाही स्ट्रॉबेरी पाठविण्यात येते.

तर महाबळेश्वरला येणारे पर्यटक स्ट्रॉबेरी खाल्ल्याशिवाय पर्यटन पूर्ण झाले, असे मानत नाहीत. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला अधिक मागणी असते; पण यावर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी लागणीला वेग आला नाही.

अति आणि सध्याही सुरू असलेल्या पावसामुळे लागण किमान १५ दिवस पुढे गेलेली आहे. महाबळेश्वर तालुक्यात दरवर्षी साधारणपणे ५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत स्ट्रॉबेरीची लागण करण्यात येते.

यासाठी जून महिन्यात परदेशातून रोपे आणण्यात येतात. जिल्ह्यातील वाई, जावळी आणि कोरेगाव तालुक्यांत नर्सरीत रोपे तयार करून नंतर लागण होते. रोपांची लागण झाल्यानंतर दोन महिन्यांपासून फळाला सुरुवात होते.

पुढे सहा महिने स्ट्रॉबेरीची एक दिवसाआड तोडणी होते; पण यावर्षी महाबळेश्वर तालुक्यात अतिपाऊस झाला आहे. यामुळे लागण कधी वेग घेणार, हे एक कोडेच आहे. त्यातच नर्सरीतील स्ट्रॉबेरी रोपांना रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचे आकडेमहाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी क्षेत्र : सुमारे ३ हजार एकरस्ट्रॉबेरी लागवड करणारी गावे : ५२स्ट्रॉबेरी उत्पादन : ३५ ते ४० हजार मेट्रिक टनवार्षिक उलाढाल : २२५ ते २५० कोटी

टॅग्स :शेतीशेतकरी