कृषी विभागाच्या विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यासाठी राज्य शासनाने महाडीबीटी प्रणाली सुरू केली आहे. याद्वारे विविध योजनांचे अर्ज शासन स्वीकारत आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून महाडीबीटीचे सर्व्हर स्लो पध्दतीने अपलोड होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बॅटरीद्वारे हाताळता येणारे पंप व कापूस साठवणूक बॅगसाठी ऑनलाइन अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. महाडीबीटीचे सर्व्हर स्लो असल्याने या पोर्टलची गती मंदावली असून या संदर्भातील अनेक तक्रारी कृषी विभागास प्राप्त होत आहेत.कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांशी निगडित विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. पूर्वी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी लेखी अर्ज करावे लागत असत. परंतू २०२१ सालापासून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन स्वरुपात अर्ज करावे लागतात. परंतु शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.त्याद्वारे शेतकरी योजनांसाठी अर्ज करू शकतात. महाडीबीटीवरून जवळपास १३ योजनांचे अर्ज स्वीकृती व प्रत्यक्ष लाभ दिले जातात. सध्या बॅटरीद्वारे हाताळता येणार पंप व कापूस साठवणूक अडचण दूर करावी महाडीबीटी प्रणाली संथ गतीने सुरु असल्याने याचा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी कृषी विभागाने लवकरात लवकर प्रयत्न करावेत, अशी मागणीही सामान्यांमधून होत आहे. बॅगसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाडीबीटी प्रणाली स्लो चालत असल्याने अर्ज करताना अडचणी येत आहेत. मुंबईवरूनच हा प्रॉब्लेम असल्याचे सांगितले जात आहे. अर्ज करण्यास अद्याप अवधी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काही दिवसात ही समस्या निकाली निघेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, हे पोर्टल संथ असल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. ते सुरु करण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाडीबीटीचे सर्व्हर स्लो; अर्ज अपलोड होइना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 12:28 PM