Lokmat Agro >शेतशिवार > एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या वतीने पिंप्री राजा येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या वतीने पिंप्री राजा येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

Maharashtra Agriculture Day celebration at Pimpri Raja on behalf of MGM Nanasaheb Kadam Agricultural College | एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या वतीने पिंप्री राजा येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या वतीने पिंप्री राजा येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली छ.संभाजीनगर येथील ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव अंतर्गत स्वामी ब्रम्हानंद महाराज विद्यालय पिंप्री राजा येथे १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषि दिनानिमित्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शेअर :

Join us
Join usNext

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून एमजीएम  नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश मस्के तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी ब्रम्हानंद महाराज विद्यालय पिंप्री राजाचे मुख्यध्यापक दिनेश देशपांडे हे होते.

डॉ. निलेश मस्के यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित विध्यार्थ्यांना कृषि दिनांचे महत्व समजावून सांगितले. त्याचबरोबर राज्यातील हरित क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याची सर्व उपस्थितांना आठवण करून दिली. तर अध्यक्षीय भाषनामध्ये देशपांडे यांनी एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण या कार्यक्रमाचे कौतिक करून अशाच समाजउपयोगी कार्यक्रमासाठी पुढील काळात आपण सोबत काम करू अशी ग्वाही दिली.

राज्यातील हरित क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती स्मरणार्थ १ जुलै हा दिवस कृषि दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली छ.संभाजीनगर यांच्या वतीने डॉ. निलेश मस्के यांच्या शुभहस्ते स्वामी ब्रम्हानंद महाराज विद्यालय पिंप्री राजा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली येथील रोपवाटिकेमध्ये तयार करण्यात आलेल्या आंबा, चिंच, कवठ, गुलमोहर ई. रोपांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारत म्हस्के यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव समन्व्यक डॉ. गजानन गोपाळ यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कृषि दूत व कृषि कन्या यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाप्रसंगी स्वामी ब्रम्हानंद महाविद्यालयांचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - एकाच मुख्यमंत्रांच्या कार्यकाळात चार कृषी विद्यापीठांची स्थापना ? वाचा इतिहासात नोंद झालेली काय आहे ही घटना

Web Title: Maharashtra Agriculture Day celebration at Pimpri Raja on behalf of MGM Nanasaheb Kadam Agricultural College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.