Join us

मक्याचं कणीस हिरवं पण त्यातील दाणे काळ्या रंगाचे; अशी मका पाहिलीय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 8:11 PM

काळ्या रंगाच्या मक्याचं कणीस पाहिलंय का?

महाराष्ट्रातील अनेक उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मक्याचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. राज्यात  पांढरा आणि पिवळ्या रंगाच्या मक्याचेच पीक मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते पण आपण काळ्या रंगाची मका पाहिलीय का? या मक्याच्या कणसातील दाणे पूर्णपणे काळ्या रंगाचे असतात. 

काळ्या मक्याचे वैशिष्ट्ये

या मक्याचे वाणाचे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमध्ये उत्पादन घेता येते. पावसाळ्यामध्ये या वाणाच्या मक्याला एका ताटाला तीन ते पाच कणीस लागतात आणि उन्हाळ्यामध्ये २ ते ३ कणीस लागतात. ताटाची उंचीची चांगली होते त्यामुळे शेतकऱ्यांना मुरघास  बनवायचा असल्याचं हा वाण चांगला ठरतो. 

तर या मक्याला बाजार दरापेक्षा कित्येक पटीने जास्त दर आहे. ही मका दुर्मिळ असल्याने सध्या बाजारात ३०० रूपये किलोप्रमाणे विक्री होत असल्याचं देशी बियाणे संवर्धक आणि मोहोळ येथील शेतकरी अनिल गवळी यांनी सांगितले आहे.

आरोग्यदायी फायदे

यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याने ही मका आरोग्यदायी आहे त्यामुळे या मक्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या मक्यापासून लाह्या आणि भाकरीसुद्धा करता येतात. ही मका स्नायूंसाठी चांगली असते, त्याचबरोबर अवजड काम केल्यानंतर या मक्याचे सेवन फायद्याचे ठरते. काळ्या मक्याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगांचा धोका कमी होतो.

बियाणे दुर्मिळ

काळ्या रंगाच्या मक्याचे बियाणे सध्या बाजारात सर्वच ठिकाणी उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी ही मका लावण्याकडे दुर्लक्ष करतात. तर हे देशी बियाणे असल्याने देशी बियाणे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे हे बियाणे उपलब्ध होऊ शकते.

टॅग्स :शेती क्षेत्रमकाशेतकरी