Lokmat Agro >शेतशिवार > Maharashtra Budget 2024: सोयाबीन-कापूस शेतकऱ्यांना आचारसंहिता संपताच मिळणार हेक्टरी ५ हजारांचे अनुदान

Maharashtra Budget 2024: सोयाबीन-कापूस शेतकऱ्यांना आचारसंहिता संपताच मिळणार हेक्टरी ५ हजारांचे अनुदान

Maharashtra Budget 2024: five thousand per hector aid for Maharashtra soybean and cotton farmers | Maharashtra Budget 2024: सोयाबीन-कापूस शेतकऱ्यांना आचारसंहिता संपताच मिळणार हेक्टरी ५ हजारांचे अनुदान

Maharashtra Budget 2024: सोयाबीन-कापूस शेतकऱ्यांना आचारसंहिता संपताच मिळणार हेक्टरी ५ हजारांचे अनुदान

Maharashtra Budget 2024: सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना आचार संहिता संपताच हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली.

Maharashtra Budget 2024: सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना आचार संहिता संपताच हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली.

शेअर :

Join us
Join usNext

Maharshtra Budget 2024:  five thousand per hector aid for soybean and cotton farmers सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात येणार असून विधान परिषद निवडणुकीची आचार संहिता संपताच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे मिळतील अशी घोषणा आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली. राज्याचा २४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडताना त्यांनी महिला आणि शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा केल्या, त्यापैकी सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही घोषणाा आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की ही या दोन्ही पिकांचे यंदा हवामान बदलामुळे बरेच नुकसान झाले. त्यांना जाहीर केलेली हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत आचार संहितेमुळे अडकून पडली होती. मात्र आचार संहिता संपताच शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी ५हजार रुपये जमा करण्यात येतील.

राज्यातील खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. मात्र खरीप हंगाम २०२२-२३मध्ये उशिराने आलेला मॉन्सून आणि ऑगस्ट २३ मध्ये २१ दिवसांचा पावसाचा खंड, तसेच नंतर आलेला अवकाळी पाऊस यामुळे मोठ्या क्षेत्रफळावरील शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला.  त्यातच या दोन्ही पिकांचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

यंदा सोयाबीन, कापूस आणि कांद्याच्या दराने शेतकऱ्यांची कोंडी केल्यानंतर  राज्य सरकारने सोयाबीन  कापूस उत्पादकांना काहीसा दिलासा दिला देण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मार्च मध्ये झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती सोयाबीन आणि कापसाला अर्थ सहाय्य देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये  बरेच निर्णय घेण्यात आले होते.  कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मागील खरीपात मोठा फटका बसला आहे. त्यातच दुष्काळ आणि गारपिटीमुळेही पिकाचे नुकसान झाल्यामुळे उत्पादन कमी झाले होते.

त्यातच बाजारदर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी मदत करण्याची मागणी केली होती. त्या मागणीवरून आज कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ४ हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली होती. आजच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पुन्हा त्याच घोषणेचा पुनरुच्चार करून अर्थमंत्र्यांनी मदत लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असे जाहीर केले.

Web Title: Maharashtra Budget 2024: five thousand per hector aid for Maharashtra soybean and cotton farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.