एखाद्या प्रदेशातील खास गोष्ट जगभरात नावजली जाणं किती मानाचं! या प्रदेशाची खास ओखळ जगभर मिरणवणाऱ्या खरंतर अनेक वस्तूंना भौगोलिक मानांकनं मिळाली आहेत. पण आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या या ८ वस्तू ज्याची ख्याती भारतातच नव्हे तर जगातही झाली आहे...
रत्नागिरी हापूस
आता घरोघरी आंबा आणला जात आहे. देवगड, कर्नाटकी, केशर, दशहरी अशा कितीकरी आंबे घेण्याकडे अनेकांचा कल असला तरी रत्नागिरी हापूसची गोष्टच और! विशेष म्हणजे रत्नागिरी हापूसला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्याचा जीआय टॅग मिळाला असून जगभरात या आंब्याचे नाव झाले आहे. इतर आंब्यांपेक्षा अधिक गोडवा आणि सुगंध रत्नागिरी हापूसमध्ये आहे. या विशेष गुणधर्मामुळे जगभरात हापूस ओळखला जातो.
नागपूरची संत्री
उन्हाळ्यात नागपूरचं संत्र त्याच्या रसाळ, आंबूस गोड स्वादामुळे आणि लवकर सोलल्या जाणाऱ्या सालीमुळे जगभरात ओळखली जाते. नागपूरच्या संत्र्याला भौगोलिक मानांकन मिळाले असून जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी नागपूरच्या संत्र्याची विशेष मागणी होते.
सोलापूरची चादर
वेगवेगळ्या विणलेल्या डिझाइनची सोलापूरी चादर पंचक्राेशीतच नव्हे तर जगभरात त्याच्या विणकाम आणि कापडातील वेशिष्ट्यामुळे ओळखली जाते. सोलापूरच्या चादरीलाही भाैगोलिक मानांकन मिळाले आहे.
पैठणी साडी
महाराष्ट्राच्या पैठणीलाही विशेष स्थान आहे. उच्च् दर्जाचं रेशीम आणि जरतारीच्या मोराने प्रसिद्ध झालेल्या पैठणीची जगभरातील स्त्रीयांमध्ये विशेष आकर्षण आहे. वेगवेगळ्या कलाकुसरीसह विविध रंगांची देखणी पैठणी आपल्याकडे असावी असे प्रत्येक महिलेला वाटत असते. जगभरात पैठणीला मानाचे स्थान मिळाले आहे.
कोल्हापूरी चपला
पेहेराव कोणताही असला तरी पायात चप्पल कोल्हापूरीच असावी असा साधारण महाराष्ट्राच्या माणसाचा या चपलीकडे पाहण्याचा दृष्टीकोन जगातही तेवढाच प्रसिदध आहे. जगभरात वेगवेगळ्या कोल्हापूरी चपला घालणाऱ्यांचे मोठे प्रमाण असून त्यात वेगवेगळ्या मऊ चामडीच्या चपलाही आता लोकप्रीय होत आहेत.
पुणेरी पगडी
महराष्ट्राच्या पुणेरी पगडीला जगभरातून मोठी मागणी आहे. भारतातून वेगवेगळ्या भागात विखूरलेल्या अनेकांना पुणेरी पगडीचे मोठे आकर्षण. महाराष्ट्राच्या अभिमानाची म्हणून ही पगडी ओळखली जाते.
वारली पेंटींग
महाराष्ट्राच्या आदिवासी भागातलं ही चित्र. महाराष्ट्राच्या पारंपरिक जगण्याचं प्रतिक म्हणून जगभरातील कलाप्रेमींना या पेंटींगचं मोठं आकर्षण आहे. शेणाने किंवा गेरूने रंगवलेल्या कापडी, कागदी किंवा अगदी भिंतीवरही या चित्रांतून आदिवासी जगणं ठळकपणे दिसते.
महाबळेश्वरची स्ट्राबेरी
लालचुटूक स्ट्रॉबेरी डोळ्यांसमोर आणली की महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीला महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी डोळ्यांसमोर येईल. मोठी रसाळ, आंबट गोड या गुणधर्मांमुळं जगभरात या स्ट्रॉबेरीचं नाव झालं आहे.