Lokmat Agro >शेतशिवार > Maharashtra Government Schemes 2024 : डिसेंबरमध्ये लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Government Schemes 2024 : डिसेंबरमध्ये लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? वाचा सविस्तर

maharashtra government schemes 2024 : government give money for scheme will benefit from december | Maharashtra Government Schemes 2024 : डिसेंबरमध्ये लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Government Schemes 2024 : डिसेंबरमध्ये लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Government Schemes 2024 : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यावर नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. शासनाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये विविध योजनांची घोषणा केली होती. त्या योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरु होईल. (Government Schemes 2024)

Maharashtra Government Schemes 2024 : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यावर नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. शासनाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये विविध योजनांची घोषणा केली होती. त्या योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरु होईल. (Government Schemes 2024)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Government Schemes 2024 : 

मुंबई :महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यावर नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. शासनाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये विविध योजनांची घोषणा केली होती. त्या योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरु होईल.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो. केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजना, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना
आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन योजना महत्त्वाच्या आहेत.

या योजनांद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. डिसेंबर महिन्यात या योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो. पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा ६ वा हप्ता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ६ वा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो. या तिन्ही योजनांचे लाभार्थी ज्या कुटुंबात आहेत त्या कुटुंबाला डिसेंबर महिन्यात ६ हजार १०० रुपये मिळू शकणार आहेत.  

६१०० रुपये कसे मिळणार?  

केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यांमध्ये एका वर्षामध्ये ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना १८ हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता मिळू शकतो. त्याचे शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळू शकतात.

याशिवाय राज्य सरकारने केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर 'नमो शेतकरी सन्मान योजना' सुरु केली होती,त्या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना ५ हप्त्यांमध्ये रक्कम देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या योजनेचा ६ वा हप्ता मिळाल्यास ते देखील २००० रुपये असे एकूण शेतकऱ्याला किंवा शेतकरी महिलेला ४ हजार रुपये मिळतील.

याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असल्यास तिला महायुतीच्या आदेशाप्रमाणे १ हजार ५०० रुपयांमध्ये ६०० रुपयांची वाढ केल्यास २ हजार १०० रुपये मिळतील, असे एकूण ६ हजार १०० रुपये लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला ६ हजार १०० रुपये मिळू शकतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत होणार वाढ?
 
महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपये पाठवले जातात. महायुतीने निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्क्म वाढवण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन महायुती सरकारने पाळल्यास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा  २ हजार १०० रुपये द्यावे लागणार आहेत.

दरम्यान, या योजनांशिवाय राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी  बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय आणि पदविका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना ८ हजार रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी १० हजार रुपये दिले जाणार आहेत.

Web Title: maharashtra government schemes 2024 : government give money for scheme will benefit from december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.