प्राचीन काळापासून बोर हे लोकप्रीय फळ. अगदी 'शबरीची बोरं' या गोष्टीपासून किंवा त्याही आधीपासून! छोट्या छोट्या समारंभात भारतात कधी सुगडात भरून तर लहानांच्या 'बोरनहाणापर्यंत याचा वापर होत आला आहे. बोराची लागवड महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भात केली जाते. साधारण ५० हून अधिक या बोराच्या जाती. पण लोक मोठ्या आवडीने आंबटगोट बोरांवर ताव मारतात.उष्णकटीबंधीय आणि कमी पाण्यातही तगणाऱ्या बोराच्या उत्पादनात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक येतो. सर्वाधिक बोराचं उत्पादन कुठे होतं?
भारतात सर्वाधिक बोरं पिकतात मध्य प्रदेशात. देशाच्या एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक हिस्सा २१.३७ टक्के या राज्याचा आहे. इथली माती आणि पाणी बोराच्या वाढीसाठी चांगली समजली जाते. बोर उत्पादनात हे राज्य अव्वल असलं तरी महाराष्ट्राचा यात पाचवा क्रमांक येतो.
भारतात १८ ते २० बोराच्या जाती
भारतात साधारण १८ ते २० बोराच्या जाती सापडतात. या फाळाला व्यावसायिक किंवा आर्थिकदृष्ट्याही फायद्याचं समजलं जातं. गुजरातमधील शेतकरीही याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. देशाच्या एकूण बोर उत्पादनात गुजरातचा १८.९ टक्के हिस्सा असल्याचे सांगण्यात येते.
काय आहेत गुणधर्म?
चवीला आंबटगोड,काहीसे तुरटही. मात्र, या इवल्याशा बोरात भरपूर पोषक तत्वं आणि खनिजे सामावली आहेत. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी सारखी गुणधर्म यात आहेत. शिवाय फायबर आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असल्याने शरिरात ऊर्जा टिकवून ठेवणारं हे फळ आहे.
महाराष्ट्राचा नंबर पाचवा
बोर उत्पादनात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक येत असल्याचे राष्ट्रीय फलोत्पाकन मंडळाचे आकडे सांगतात. शेतकरी दरवर्षी ९.२६ टक्के बोराची लागवड करतात. भौगोलिक परिस्थिती आणि त्या राज्याच्या जमिनीच्या गुणधर्मांनुसार बोराच्या जाती शेतकरी निवडतात. जळगाव, अंबा, केसर, गिरीजा आणि दापोली या महाराष्ट्रातल्या बोराच्या प्रसिद्ध जाती आहेत. अनेकजण आपल्या सोयीनुसार हायब्रीड जातींचीही निवड करतात.
इतर राज्यांची काय स्थिती?
बोराच्या उत्पादनात सर्वाधिक वाटा मध्य प्रदेशचा आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात राज्य येते. साधारण १३.१५ टक्के बोर उत्पादन घेत छत्तीसगडचा तिसरा क्रमांक येतो. तर आंध्र प्रदेश दरवर्षी १०.४१ टक्के बोराचे उत्पादन घेतो. ही पाच राज्ये मिळून ७० टक्के बोरांचे उत्पादक करतात.