Join us

Peru Rate Collapse : पेरूचे दर कोसळले! ५० रूपयांचा दर २५ रूपयांवर; शेतकरी चिंतेत

By दत्ता लवांडे | Published: October 17, 2024 8:46 PM

Peru Rate Collapse : राज्यभरातील पेरूच्या लागवडी झपाट्याने वाढत असून सध्या मार्केटमधील पेरूचे दर कोसळले आहेत.

Peru Rate Collapse : राज्यभरात आता पेरू लागवडीचे लोन पसरत चालले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील शेतकरी जास्त पैसे देणाऱ्या म्हणून प्रचलित झालेल्या पेरू शेतीकडे वळू लागले आहेत. पण सध्या पेरूचे बाजारातील दर कोसळल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तैवान पिंक, व्हीएनआर, लखनौ, सरदार, रेड डायमंड अशा विविध जातीच्या पेरूची लागवड मागील काही वर्षामध्ये केली. आता या शेतकऱ्यांचा माल बाजारात येऊ लागला आहे पण दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कमी दरात पेरूची विक्री करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी फोम लावलेले पेरू फेकून देतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

का पडतायेत दर?मागील काही दिवसांपासून बाजारातील पेरूची आवक झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे ८० ते १०० रूपये किलोप्रमाणे विक्री होत असलेला पेरू आज १५ ते २५ रूपयांच्या आत विक्री होत आहे. काही ठिकाणी ५० रूपये किलोप्रमाणेही पेरूची विक्री होत आहे. 

किती मिळतोय दर?आज पुणे बाजार समितीमध्ये सरासरी ८२२ क्विंटल पेरूची आवक झाली होती. येथे २० रूपयांचा सरासरी दर मिळालाय. पण नाशिकमध्ये ९९ क्विंटल आवक झालेल्या पेरूला ३ हजार ते ६ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. मागील एका आठवड्याचा आढावा घेतला तर १ हजार ५०० ते ४ हजारापर्यंत प्रतिक्विंटल सरासरी दर शेतकऱ्यांना मिळत आहे. व्हीएनआर जातीच्या पेरूला ३५ रूपयापर्यंत दर मिळत असल्याची माहिती आहे.

खर्च जास्तअनेक शेतकरी पेरूला डंकमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फोम आणि पिशवी लावतात. फोम-पिशवी विकत घेऊन लावण्यासाठी शेतकऱ्यांचा एकरी ३० हजारांपासून २ लाखांपर्यंत खर्च येतो. लागवडीच्या पद्धतीनुसार कमीजास्त खर्च होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात किमान ३० रूपये प्रतिकिलो दर मिळणे अपेक्षित आहे. पण सध्याचे दर हे खाली आले असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.

लागवडी वाढतायेतराज्यातील अनेक शेतकरी पेरू लागवडीकडे वळाले आहेत. पेरूमधून चांगले पैसे कमावण्याच्या उद्देशाने पेरूच्या लागवडी झपाट्याने वाढत असून या लागवडीचा फटका येणाऱ्या काळात दरांवर होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

Success Story : व्वा रे पठ्ठ्या! शेतकरी पुत्राने एका दिवसात विकला ३ लाखांचा झेंडू; अडीच लाखाचा नफा

माझ्याकडे ५ एकर व्हीएनआर जातीचे पेरू सध्या हार्वेस्टिंगला आले आहेत. पण बाजारातील दर कोसळले आहेत. सध्या व्हीएनआर जातीला ३५ रूपयांचा दर आहे पण तैवान पिंक पेरूचे दर १५ ते २० रूपयापर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे व्यापारी म्हणतात बाजारात पेरू आणूच नका.- दत्ता पाटील (पेरू उत्पादक शेतकरी, धाराशिव)

 

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरी