Join us

Maharashtra Rain Update राज्यात जून महिन्यात कुठे-किती पाऊस पडला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 2:57 PM

यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याचा अंदाज मी २ जूनला वर्तविला होता. जूनमध्ये पावसाचा खंड राहील, हेसुद्धा सांगितले होते. जमिनीत दोन ते अडीच फूट खोल ओल आल्याशिवाय पेरणी करू नये. जूनमध्ये काही ठिकाणी ढगफुटी झाली.

यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याचा अंदाज मी २ जूनला वर्तविला होता. जूनमध्ये पावसाचा खंड राहील, हेसुद्धा सांगितले होते. जमिनीत दोन ते अडीच फूट खोल ओल आल्याशिवाय पेरणी करू नये. जूनमध्ये काही ठिकाणी ढगफुटी झाली.

काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच अनेक मोठ्या धरणांच्या क्षेत्रात अजून चांगल्या पावसास सुरुवात झालेली नाही, ही एक चिंतेची बाब आहे.

सध्या पावसाने का मारलीय दडी ?

• समुद्राचे तापमान आणि हवेचे तापमान घसरते, त्याचा पावसावर परिणाम होतो. सध्या कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली आहे.• तापमान कमी होते, त्यामुळे हवेचा दाब वाढतो. परिणामी पावसाचे प्रमाण कमी होते. पावसाने दिलेली उघडीप आणि तापमानाचा अशा प्रकारचा संबंध आहे.• कमाल तापमान वाढल्याने पुन्हा 'क्लाउड सिस्टिम सुरू होते. हवेचा दाब कमी झाला की, पाऊस पडतो.• हवेचा दाब अत्यंत कमी झाला की, ढगफुटीसारखे प्रकार होतात.

१ ते २६ जूनपर्यंत कुठे किती पाऊस?

• जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे.• काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते, काही ठिकाणी मोठा पाऊस होईल.• जुलैमध्येही पावसाचा खंड राहील. काही दिवस कोरडे जातील.• ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही चांगला पाऊस दिसत आहे.

कुठे किती आणि कसा असेल पाऊस ?

■ सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस - धाराशिव, लातूर, सोलापूर■ सरासरीपेक्षा जास्त पाऊस - सांगली, अहमदनगर, परभणी, बीड, जालना व जळगाव■ सरासरी पाऊस - नांदेड, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा■ सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस - अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, ठाणे व कोल्हापूर■ सरासरीपेक्षा ६०% ते ८०% कमी पाऊस - हिंगोली, गोंदिया व भंडारा

जुलैमध्येही पावसाचा खंड राहील. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते, मोठा पाऊस होईल, तर काही दिवस कोरडे जातील. पुढे ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही चांगला पाऊस दिसत आहे.

यंदा सोयाबीनचा पेरा कमी होईल, असा अंदाज आहे. विदर्भात सुरुवातीला पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी कापूस लागवड झाली आहे. उदीड, मूग, तूर, तर काही ठिकाणी बाजरीची पेरणी झाली आहे. पिकांची दोन-दोन बोटे वाढ झाली आहे. मात्र, पावसाअभावी त्यांच्या वाढीची चिंता आहे.

डॉ. रामचंद्र साबळेकृषी हवामानतज्ञ

टॅग्स :पाऊसशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनखरीपशेती क्षेत्र