Join us

Sowing : राज्यात अद्याप किती क्षेत्रावर झाल्या पेरण्या? कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकटाची भिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:01 AM

Maharashtra Kharip 2024 Crop Cultivation Updates : मागच्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांचे संकट येण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

Maharashtra State Sowing Updates : राज्यातील पेरण्या पावसामुळे खोळंबल्या आहेत. पहिल्या पावसातच अनेक शेतकऱ्यांनी पुरेसी ओल नसल्याने पेरण्या केल्या आहेत, पण अद्याप जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्यामुळे शेतकऱ्यांवर वेगळेच संकट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर मागच्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांचे संकट येण्याची भिती निर्माण झाली आहे. 

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पुरेसा पाऊस नसल्यामुळे सध्या राज्यातील केवळ ५५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात १ कोटी ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होणे अपेक्षित असताना जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे २९ जून रोजीच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात केवळ ७९ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 

राज्यातील सर्वांत जास्त पेरण्या (Sowing) या लातूर विभागात झाल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. या विभागात १८ लाख ३८ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर कोकण विभागात सर्वांत कमी क्षेत्रावर म्हणजे १६ हजार ५१४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.  त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागात ३ लाख ७३ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. 

(Maharashtra Kharip 2024 Crop Cultivation Updates)

कोणत्या विभागात किती क्षेत्रावर झाल्या पेरण्या

  • कोकण विभाग - १६ हजार ५१४ हेक्टर
  • नाशिक विभाग - ९ लाख ३९ हजार हेक्टर
  • पुणे विभाग - ७ लाख ३७ हजार हेक्टर
  • कोल्हापूर विभाग - ३ लाख ७३ हजार हेक्टर
  • छत्रपती संभाजीनगर विभाग - १६ लाख ६४ हजार हेक्टर
  • लातूर विभाग - १८ लाख ३८ हजार हेक्टर
  • अमरावती विभाग - १६ लाख ७१ हजार हेक्टर
  • नागपूर विभाग - ६६ हजार हेक्टर 
टॅग्स :पेरणीशेती क्षेत्रशेतकरीलागवड, मशागत