Lokmat Agro >शेतशिवार > आंब्याचा धंदा, करतोय वांधा!

आंब्याचा धंदा, करतोय वांधा!

maharashtra state farmer mango business farming problem | आंब्याचा धंदा, करतोय वांधा!

आंब्याचा धंदा, करतोय वांधा!

कमालीचा गोडवा, आकर्षक रंग आणि स्वाद या  आपल्या अंगभूत गुणांमुळे 'हापूस' जगात भारी आहे.

कमालीचा गोडवा, आकर्षक रंग आणि स्वाद या  आपल्या अंगभूत गुणांमुळे 'हापूस' जगात भारी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

दिवाळीपूर्वी कोकणातून मुंबईत आंबा आला. पाठोपाठ मलावीचा आंबा आला. त्यांना घसघशीत भाव मिळाला. कल्टारच्या अतिवापरामुळे झाडांचे आयुष्य कमी होत असले, तरी त्याचा वापर करून हापूस लवकर बाजारात आणण्याची चढाओढ लागते. हे नैसर्गिक नाही.

कमालीचा गोडवा, आकर्षक रंग आणि स्वाद या  आपल्या अंगभूत गुणांमुळे 'हापूस' जगात भारी आहे. आता जीआय मानांकनामुळे कोकणचा हापूस असं वेगळं म्हणायची गरजच नाही. या हापूसच्या दरवर्षीच्या येण्याचे स्वतःचे असे गणित आहे. पुरेसा पाऊस, ऑक्टोबरमधील कडक उन्हाळा, त्यानंतर नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाली की अगदी महामार्गापासून कोकणातल्या गल्लीबोळांत मोहराचा दरवळ मोहवून टाकतो. नोव्हेंबरला मोहरलेली कलमे मार्चपासून तयार फळ देऊ लागतात.

मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने म्हणजे हापूसचा मुख्य हंगाम अलीकडच्या काळात मात्र सगळेच तंत्र बदलले. हापूसचे कलम एक वर्षाआड पीक देते; पण, खते, औषधे आणि मनुष्यबळाचा विचार करता ते आर्थिक गणितात बसत नाही, त्यातही हापूसला भाव मिळतोय हे कळल्यानंतर त्याचे उत्पादन दरवर्षी हवे असते. त्यामुळे खतांचा त्यातही पॅक्लोब्युटीझर अर्थातच कल्टारचा वापर वाढला. झाडाचा शाखा विस्तार होऊ न देता ती ताकद मोहर वाढविण्यात वापरली जाते.

खरं तर उत्पादन वाढविण्यासाठी म्हणून त्याचा मूळ वापर सुरू झाला, पण आता उत्पादन लवकर हाती यावे यासाठी जुलै, ऑगस्टऐवजी जूनपासून आणि तोही गरजेपेक्षा जास्त कल्टारचा वापर होऊ लागला कल्टार हे कृषी विद्यापीठानेही प्रमाणित केले आहे; मात्र त्यासोबत जी अला खतांची हवी ती दिली जात नाही त्यामुळे कल्टारचा अतिवापर हा झाडाच्या आयुष्यावर विपरीत परिणाम करणारा ठरतो, खालनाची ताकद कमी होते. या वेलीसारख्या लांबणाऱ्या होतात. झाड अशक्त होते.

चवीत पडतो फरक

हापूसचा नैसर्गिक हंगाम मार्च, एप्रिल, मे हाथ आहे. तेव्हा त्याची चय नैसर्गिक असते. त्याच वेळी त्याची मूळ चव अनुभवता येते. इतर वेळेच्या आंब्याच्या चवीत फरक पडतो.

गणित बिघडलेलेच

खते आणि औषधे अतिमहागली आहेत. मनुष्यबळ मिळत नाही. आणि परवडतही नाही. त्यातच बदललेल्या ऋतुचक्रामुळे कमी होणारी उत्पादकता यामुळे स्वतः बाग करण्यापेक्षा बागायतदार ती व्यापाऱ्यांकडे देतात. व्यापारी आपली आर्थिक गणित सोडविण्यासाठी जूनपासून कल्टारचा वापर करतात. हेच हापूसचे व्यावसायिक गणित आले आहे.

अॅड. अजित गोगटे (माजी आमदार, अध्यक्ष, देवगड तालुका आंबा उत्पादक संघ)

(शब्दांकन : मनोज मुळ्ये]

Web Title: maharashtra state farmer mango business farming problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.