Lokmat Agro >शेतशिवार > फळपिक विमा योजनेसाठी कोणत्या जिल्हांना कोणती विमा कंपनी? जाणून घ्या | Crop Insurance

फळपिक विमा योजनेसाठी कोणत्या जिल्हांना कोणती विमा कंपनी? जाणून घ्या | Crop Insurance

maharashtra state Which insurance company for which districts for fruit crop insurance scheme Learn | Crop Insurance | फळपिक विमा योजनेसाठी कोणत्या जिल्हांना कोणती विमा कंपनी? जाणून घ्या | Crop Insurance

फळपिक विमा योजनेसाठी कोणत्या जिल्हांना कोणती विमा कंपनी? जाणून घ्या | Crop Insurance

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मृग बहार आणि आंबिया बहारातील १३ फळ पिकांसाठी ही योजना लागू केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, ही फळपीक योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित केलेल्या फळपिकांसाठी लागू आहे. या हंगामात राज्यात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, पपई, काजू, स्ट्रॉबेरी व द्राक्ष (क) इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे.

मृग बहरात द्राक्ष (क), संत्रा, पेरू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची २५ जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे; त्याचबरोबर मोसंबी चिकू ३० जून, डाळिंब १४ जुलै तर सीताफळ पिकासाठी ३१ जुलै ही मुदत देण्यात आली आहे. या योजनेत विविध जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ४ विमा कंपन्या नेमल्या आहेत. 

कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणत्या विमा कंपन्या?
भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई
- जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा,रत्नागिरी
फ्यूचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. - जालना
युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि. - छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे - ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशिम

Web Title: maharashtra state Which insurance company for which districts for fruit crop insurance scheme Learn | Crop Insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.