Lokmat Agro >शेतशिवार > रखडलेल्या खरीप आढावा बैठकीत नेमकं काय घडलं? शेतकऱ्यांसाठी काय केल्या सूचना?

रखडलेल्या खरीप आढावा बैठकीत नेमकं काय घडलं? शेतकऱ्यांसाठी काय केल्या सूचना?

maharasshtra agriculture farmer Kharif review meeting What suggestions for farmers monsoon | रखडलेल्या खरीप आढावा बैठकीत नेमकं काय घडलं? शेतकऱ्यांसाठी काय केल्या सूचना?

रखडलेल्या खरीप आढावा बैठकीत नेमकं काय घडलं? शेतकऱ्यांसाठी काय केल्या सूचना?

खरीप आढावा बैठक काल मुंबईत पार पडली.

खरीप आढावा बैठक काल मुंबईत पार पडली.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : बऱ्याच दिवसांपासून रखडलेली खरीप आढावा बैठक काल मुंबईत पार पडली. यामध्ये खरीप हंगामासाठी विविध निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आले आहेत. यामध्ये खते, बियाणे, शेतकऱ्यांची फसवणूक, हवामान, पेरण्या आणि नुकसानीसंदर्भातील भरपाई यासंदर्भातील सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. 

दरम्यान, या बैठकीत राज्यातील पर्जन्याची स्थिती, खते बियाणे उपलब्धता तसेच सन २०२४-२५ मधील पिकाखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता लक्षांक या विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करणे, खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कारवाईच्या सूचना दिल्या. 

त्याचबरोबर बोगस बियाणे कंपन्यांच्या विरोधात कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांच्या संरक्षणार्थ आणि आपत्ती काळातील नुकसानीच्या त्वरित पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 'ला निना'मुळे येणाऱ्या जुलै महिन्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीयस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत. 

Web Title: maharasshtra agriculture farmer Kharif review meeting What suggestions for farmers monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.