Lokmat Agro >शेतशिवार > Mahavitaran Chatbot : रात्री अचानक वीज गायब; एका क्लिकवर झटपट सेवा मिळणार कशी वाचा सविस्तर

Mahavitaran Chatbot : रात्री अचानक वीज गायब; एका क्लिकवर झटपट सेवा मिळणार कशी वाचा सविस्तर

Mahavitaran Chatbot : Sudden power outage at night; Read in detail how to get instant service with one click | Mahavitaran Chatbot : रात्री अचानक वीज गायब; एका क्लिकवर झटपट सेवा मिळणार कशी वाचा सविस्तर

Mahavitaran Chatbot : रात्री अचानक वीज गायब; एका क्लिकवर झटपट सेवा मिळणार कशी वाचा सविस्तर

महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणत्या सुविधा आहेत वाचा सविस्तर. (Mahavitaran Chatbot)

महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणत्या सुविधा आहेत वाचा सविस्तर. (Mahavitaran Chatbot)

शेअर :

Join us
Join usNext

हिंगोली शहरांसह ग्रामीण भागात वीजप्रश्न सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. अनेकवेळा आंदोलने होतात, मोर्चे निघतात. परंतु, वीजप्रश्न काही सुटत नाही. शिवाय तक्रारीची दखलही कुणी घेत नसल्याचा अनुभव वीज ग्राहकांसाठी नेहमीचाच आहे. 

त्यात आता महावितरणच्या वतीने वीज गेली, खांब पडला किंवा इतर काही समस्या असेल तर एका क्लिकवर सेवा मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. महावितरणची ही सेवा खरेच फायद्याची ठरेल का? यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महावितरणने राज्यातील ३ कोटी वीज ग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करून वीज ग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी 'ऊर्जा' चॅटबॉट महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाइल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महावितरणच्या वीजसेवेबाबत ग्राहकांना माहिती हवी असल्यास ऊर्जा चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. संबंधित सेवेच्या थेट लिंक ग्राहकांना या चॅटबॉटमधूनच देण्यात आलेल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होणे, वीजबिलांसह इतर तक्रारींबाबत संपूर्ण माहिती वीज ग्राहकांना उपलब्ध होत आहे.

काय आहे ऊर्जा चॅट बॉट?

ग्राहक सेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी 'ऊर्जा' नावाचे चॅटबॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे. 
इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅटबॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येतात. तसेच नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण याबाबत माहिती घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कसा करणार वापर?

राज्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी असलेल्या 'ऊर्जा' चॅटबॉटचा वापर करायचा आहे. www.mahadiscom.in ही वेबसाईट सर्च करायची व वेबसाइट ओपन केल्यानंतर नोंदणी केलेला मोबाइल नंबर टाकायचा, त्यानंतर गरजेनुसार पर्याय निवडायचा आहे.

कशासाठी करणार वापर?

मोबाइल क्रमांक व ई-मेलची नोंदणी, इतर विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, अर्जाची सद्यःस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, वीजवापर व बिलाचे कॅलक्युलेशन आदी सेवांबाबत वीज ग्राहकांना 'ऊर्जा चॅटबॉट'चा वापर करता येतो.

मोबाइलवरूनच नोंदविता येणार तक्रार

''ऊर्जा चॅटबॉट''चा वीजग्राहक मोठ्या संख्येने वापर करीत असून, त्यांना वीजसेवा किंवा तक्रारी नोंदविण्याबाबत माहिती घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची आता आवश्यकता उरलेली नाही. मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाइल क्रमांक किवा ग्राहक क्रमांक सबमिट करून विविध सेवा घेण्यासाठी चॅटबॉटद्वारे महावितरणशी संवाद साधता येईल, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Mahavitaran Chatbot : Sudden power outage at night; Read in detail how to get instant service with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.