वाशिम : मागील काही वर्षांत राज्यात मका लागवडीचे (Maize Cultivation) क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामागे केंद्र सरकारच्या (Central Government) इथेनॉल निर्मिती धोरणाचा मोठा वाटा असून, फायदा दिसायला लागल्याने जिल्ह्यातही अधिकांश शेतकरी या पिकाकडे वळले आहेत.
केंद्र सरकारने २०२५-२६ पासून इंधनात २० टक्के इथेनॉल (Ethanol) मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मक्यापासून इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिले आहे. यामुळे मक्याच्या लागवड क्षेत्रात अनेक ठिकाणी वाढ झाली आहे.
इथेनॉल निर्मितीसाठी मागणी वाढली!
* इथेनॉल निर्मितीमध्ये मक्याचा वापर व्हायला लागल्याने या शेतीमालाची मागणी अचानक वाढलेली आहे.
* जे शेतकरी मक्याचे पीक घेत आहेत, त्यांना चांगली मिळकत होत आहे.
जिल्ह्यात मका लागवडीचे क्षेत्र नगण्य
* जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प नाहीत. यासह नद्यांचे पाणीदेखील मिळत नसल्याने मका लागवडीचे क्षेत्र अगदीच नगण्य आहे.
* गेल्या खरिपात ६५ हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती.
मका लागवडीसाठी अडचण काय?
* पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नसणे.
* वन्यप्राण्यांचा त्रास आदी कारणांमुळे मका लागवडीला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.
पशुखाद्य म्हणूनही वापर!
* पशुखाद्य म्हणूनही मक्याचा सर्वाधिक वापर केला जातो. ही बाब मका उत्पादकांसाठी फायदेशीर ठरली आहे.
जिल्ह्यात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध नाही. यासह वन्यप्राण्यांचा त्रास असल्याने मका लागवडीचे प्रमाण कमी आहे. खरिपात ६५ तर रब्बी हंगामात ११९ हेक्टरवर मक्याची लागवड झाली. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम
हे ही वाचा सविस्तर : Tomato Market : टोमॅटोचे गणित बिघडण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर