Lokmat Agro >शेतशिवार > ​असे करा हरभरा पिकातील घाटे अळी व मर रोगाचे व्यवस्थापन

​असे करा हरभरा पिकातील घाटे अळी व मर रोगाचे व्यवस्थापन

​Management of ghat worm and die disease in gram crop maharashtra agriculture farmer | ​असे करा हरभरा पिकातील घाटे अळी व मर रोगाचे व्यवस्थापन

​असे करा हरभरा पिकातील घाटे अळी व मर रोगाचे व्यवस्थापन

मर रोग आणि घाटे अळी या दोन रोगांचे प्रादुर्भाव हरभऱ्यावर दिसत आहेत.

मर रोग आणि घाटे अळी या दोन रोगांचे प्रादुर्भाव हरभऱ्यावर दिसत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यभरातील हरभरा पीक सध्या जोमात असून हरभऱ्याचे घाटे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या परिस्थितीत प्रामुख्याने मर रोग आणि घाटे अळी या दोन रोगांचा प्रादुर्भाव हरभऱ्यावर दिसत आहेत. या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी कसे व्यवस्थापन करावे यासंदर्भातील सविस्तर माहिती...

हरभरा पिकातील घाटे अळी व्यवस्थापन

लक्षणे:-

  • घाटे अळीच्या लहान अळ्या सुरवातीस पानांची खालील बाजू खरवडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरट डाग दिसून येतात, प्रादुर्भाव जास्त असल्यास पानांची जाळी झालेली दिसून येते.

  • अळ्या झाडांचे कोवळे शेंडे देखील कुरतडून खातात त्यामुळे शेंडे पाने विरहित होतात.

  • पिकास आलेल्या कळ्या व फुले देखिल अळ्या कुरतडून खातात परिणामी घाटे कमी प्रमाणात तयार होतात.

  • पूर्ण वाढ झालेली अळी अतिशय खादाड असून अळी घाट्यात डोके खुपसून आतील दाणे फस्त करते. त्यामुळे घाटयांवर गोलाकार छिद्रे दिसून येतात.

  • घाटे पक्वतेच्या कालावधीतील ढगाळ वातावरण किडीच्या वाढीस अतिशय पोषक असल्यामुळे अल्पावधीतच किडीची संख्या झपाट्याने वाढू शकते.

एकात्मिक व्यवस्थापन -

१) पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्रॅम ज्वारी शेतामध्ये फेकावी जेणेकरून त्याचा नैसर्गिक पक्षी थांबा' म्हणून चांगला उपयोग होतो.

२) वेळोवेळी निंदणी / कोळपणी करून पीक तण विरहित ठेवावे. बांधावरील कोळशी, रानभेंडी व पेटारी इ. तणे काढून नष्ट करावीत.

३) मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.

४) इंग्रजी टी आकाराचे पिकापेक्षा १ ते १.५ फुट अधिक उंचीचे पक्षीथांबे ५० प्रती हेक्टरी दर १५-२० मीटर अंतरावर लावावेत. त्यामुळे चिमणी, साळुंखी, कोळसा इ. पक्षी त्यावर बसतात व घाटे अळ्या बेचून खातात.

५) घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत.

६) पिक सुरवातीला कायिक वाढीत असतांना ५ % निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन ०.३०% डब्लू. एस. पी. ३०० पी. पी. एम. ५० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पहिली प्रतिबंधात्मक फवारणी व १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी केल्यास घाटे अळीचा पतंग अशा पिकावर अंडी घालण्याचे टाळतो.

७) पिक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना व घाटे भरतांना सुरवातीच्या काळात अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य तितक्या अळया वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात.

८) जैविक घटकांचा वापर घाटेअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या दिसू लागताच, एच. ए. एन. पी. व्ही. विषाणू २५० एल. ई. १० मि.ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. विषाणूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी १ ग्रॅम राणीपाल (नीळ) फवारणीच्या द्रावणात मिसळावे. रोगकारक बुरशी बिव्हेरिया बॅसिअॅना १.१५ % डब्लू. पी. ५० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिनजिएन्सीस कुर्सटाकी प्रजाती ०.५ % डब्लू. पी. ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

९) रासायनिक किटकनाशके-किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास (दोन अळ्या प्रती मीटर ओळीत आढळून आल्यास किंवा ५ टक्के घाट्यांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अथवा सतत २-३ दिवस प्रत्येक सापळ्यात ८ ते १० पतंग आढळून येत असल्यास) कीटकनाशकांची फवारणी करावी.

फवारणीसाठी उपलब्ध रासायनिक किटकनाशके

.क्र.

किटकनाशके

वापराचे प्रमाण (प्रती १० लीटर पाणी)

इमामेक्टीन बेन्झोएट १.९० % ई. सी. किंवा

७.५ मि.ली.

2

क्लोरेंट्रॅनिलीप्रोल १८.५० % एस. सी. किंवा

२.५ मि.ली.

3

ईथिऑन ५० % ई. सी. किंवा

२० मि.ली.

फ्लुबेन्डामाईड २० % डब्लू. जी. किंवा

५ ग्रॅम

फ्लुबेन्डामाईड ३९.३५ % डब्लू. जी. किंवा

२ मि.ली.

नोव्हॅल्युरॉन १०% ई. सी. किंवा

१५ मि.ली.

क्विनॉलफॉस २५ % ई. सी. किंवा

२० मि.ली.

नोव्हॅल्युरॉन ०५.२५% + इंडोक्साकार्ब ०४.५०% एस. सी.

१६.५ मि.ली.

 

हरभऱ्यावरील मर रोग

  • मर रोग फ्युजारियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमीनीमधून आणि रोगग्रस्त बियाणेव्दारे होतो.

  • मर रोगाची बुरशी साधरणतः ६ वर्षापर्यंत जमीनीत जिवंत राहू शकते. पण ज्या भागात हवामान जास्त थंड राहते तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो.

लक्षणे:-

  • या रोगाच्या बुरशीमुळे झाडाच्या अन्नद्रव्य वाहून नेणाऱ्या पेशी मरतात.

  • झाडाचा जमिनी वरचा भाग, देठ आणि पाने सुकतात व झाडे वाळून मरतात.

  • जमिनी खालचा खोडाच्या भागाचा रंग फिकट होतो व कोवळी रोपे सुकतात.

  • रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास आतील भाग तांबुस, तपकिरी व काळसर रंगाचा झालेला दिसतो.

एकात्मिक व्यवस्थापन-

१) पिकाची वेळेवर पेरणी करावी. मर प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा.

२) लागवडीपूर्वी ३ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ट्रायकोडर्मा हरजियानाम १.०% डब्ल्यू. पी. ६ ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

३) ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५ किलो प्रती हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावे..

४) ट्रायकोडर्मा व्हीरीडी ५ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

५) रोगग्रस्त झाडे आढळून आल्यास तात्काळ उपटून नष्ट करावीत.

 

Web Title: ​Management of ghat worm and die disease in gram crop maharashtra agriculture farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.